Breaking News LIVE : पालघर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लावण्याच्या घटना समोर
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा marathi.abplive.com
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Mar 2021 11:34 PM
उस्मानाबाद : पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले असून, सोबत सासरकडील मंडळी देखील माझ्या जिवावर उठली असल्याचा आरोप त्याने व्हिडीओमध्ये केला आहे. सदर व्हिडिओमध्ये तो आत्महत्या करणार असल्याचं बोलत असून, त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा तहसील कार्यालयाला कोरोनाचा विळखा.
बुलढाणा तहसील कार्यलयात 18 कर्मचारी कोरोनाबाधित.
पुढील काही दिवस कार्यलयात फक्त महत्वपूर्ण कामच होतील. 27 पैकी 18 कर्मचारी कोरोनाबाधित.
बुलढाणा कोरोना अपडेट्स. जिल्ह्यात आज 379 नवीन रुग्नांची नोंद. जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकड़ा 21304, जिल्ह्यात आज 2669 एक्टिव रुग्ण आहेत.
पालघर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लावण्याच्या घटना समोर येत असून,आज वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला डोंगराला गेल्या चार दिवसा पासून आग लावण्याचे प्रकार सुरू असून आजही या डोंगराला मोठी आग लागली आहे
परळी महामार्गावर ट्रक चालकाचा थरार ; रिक्षा-दुचाकी-टाटा एसीला दिल्या भीषण धडक. 5 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी. भरधाव वेगातील ट्रक चालकाने बीड - परळी महामार्गावर थरार केलाय. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिल्याने,पळून जातांना पुन्हा एका दुचाकीसह टाटा एसी (छोटा हत्तीला ) गाडीला भीषण धडक दिलीय. या झालेल्या तिहेरी अपघात , रिक्षातील पाच जण ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.तर मृतात 2 लहान बालकांचा व 3 महिलांचा समावेश आहे.हा अपघात बीड - परळी महामार्गावरील मोची पिंपळगाव फाटा , घोडका राजुरी फाटा या दोन ठिकाणी झालाय.तर पुढं गेल्यानंतर ट्रक देखील पलटी झाला आहे.सध्या अपघातातील जखमींवर बीड जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे.
मुंबई : राज्यात आज 11141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6013 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2068044 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97983 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.17% झाले आहे.
सोलापूर : सोलापुरातील नान्नज माळढोक अभयारण्यातील गवताला अकोलेकाटी हद्दीत आज आग लागली. दुपारी 12 च्या सुमारास ही आग लागली होती. आगीमुळे अभयारण्य क्षेत्रातील जवळपास 20 ते 25 हेक्टर क्षेत्रातील गवत जळून गेले. अभयारण्य परिसरात दुपारपासून जोरात वारा सुरू होता. त्यामुळे विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन ठिणगी पडून आग लागली असल्याची शक्यता वनपाल गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सुमारे 4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणत्याही प्राण्याच्या जीवाला हानी झाल्याच समोर आलेलं नाही.
नाशिक : 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना पाठोपाठ आता विद्रोही संमेलनही स्थगित करण्यात आले आहे. संविधान सन्मानार्थ 15 वे विद्रोही संमेलन नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के टी एच एम महाविद्यालयाच्या प्रांगणात 25 आणि 26 मार्च रोजी पार पडणार होते मात्र नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्रोहीच्या राज्य कार्यकारणीने आज नाशिक येथे संयोजन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली असता स्थगितीचा निर्णय घेण्यात आलाय. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या तारखांनाच विद्रोही संमेलन घेण्यात येणार आहे.
उरण तालुक्यातील केगाव येथील कुटुंबीय हे शनिवारी मुलाच्या उपचारासाठी नवीमुंबईतील रुग्णालयात गेले होते. तर, मुलाची आजी ही रात्री कामाला गेली होती. याच संधीचा फायदा घेत चोराने घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून घरात शिरून कपाटातील दागिने आणी सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. यामध्ये, कपाटातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोने देखील चोरण्यात आले असल्याचे रविवारी सकाळी कामावरून घरी परतलेल्या आजीच्या निदर्शनास आले. यामुळे, या घटनेची माहिती मोरा पोलीसांना देण्यात आली असून या घटनेच्या तपासासाठी फिंगर- प्रिंट तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने पार केला पाचशेचा आकडा. आज 563 जणांना कोरोनाची लागण. नाशिक शहर - 314, नाशिक ग्रामीण - 189, मालेगाव मनपा - 49, जिल्हा बाह्य - 11. सध्या 3 हजार 946 बाधितांवर उपचार सुरु. एक महिन्यात साडेतीन पटीने रुग्णसंख्येत झालेली वाढ चिंताजनक. परिस्थिती कायम राहिल्यास कडक निर्बंध लावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना पाठोपाठ आता विद्रोही संमेलनही स्थगित करण्यात आले आहे. संविधान सन्मानार्थ 15 वे विद्रोही संमेलन नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के टी एच एम महाविद्यालयाच्या प्रांगणात 25 व 26 मार्च रोजी पार पडणार होते मात्र नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्रोहीच्या राज्य कार्यकारणीने आज नाशिक येथे संयोजन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली असता स्थगितीचा निर्णय घेण्यात आलाय. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या तारखांनाच विद्रोही संमेलन घेण्यात येणार आहे.
11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन. कोरोना प्रादुर्भावामुळं प्रशासनाचा निर्णय. लग्न समारंभांनाही बंदी. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता, सक्तीचा लॉकडाऊन. राजकीय सभा, शाळा, महाविद्यालयं बंद
कल्याण पूर्वेकडील कचोरे भागात आज भटक्या कुत्र्याने एका नऊ वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
मनसुख हिरेन प्रकरणात हत्येचा गुन्हा. विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा. महाराष्ट्र एटीएसकडून हत्येचा गुन्हा.
#IPL2021 : यंदाचं आयपीएल भारतातच... 9 एप्रिलपासून होणार आयपीएलच्या चौदाव्या मोसमाला सुरुवात, 30 मे रोजी कोलकात्यात होणार #IPL ची फायनल, अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई, कोलकात्यात सामन्यांचं आयोजन
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मागच्या सात दिवसांपूर्वी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती, ही संचारबंदी उद्यापासून उठणार आहे. परंतु, तरीही रुग्ण संख्या कमी न झाल्याने रात्रीची संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. दिवसा जरी बाजारपेठ खुली करण्यात येत असली तरी रात्री 7 ते सकाळी सातपर्यंत सर्व प्रकारची बाजारपेठ बंदच राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने सुरू करताना आपण निगेटिव असल्याचे प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर हॉटेल, बार, शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळ बंद राहणार आहेत. केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना पार्सल देण्याची मुभा असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज याबाबत आज आदेश काढले आहेत. त्याचबरोबर सर्वांना कोरोना बाबतचे नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे.
साडेतीन तासांच्या चौकशी नंतर एटीएसची टीम मनसुख हिरेन यांच्या घरातुन बाहेर. मनसुख हिरेन यांच्या घरात एटीएस टीम हिरेन यांच्या कुटुंबाची चौकशी करत होती. हिरेन मृत्यृप्रकरणी एटीएसच्या तपासाला वेग.
अंबरनाथ येथील बुवापाडा परिसरात असलेल्या खडी मशीनवर एका साडेचार वर्षाच्या मुलाचा ग्रीट रेती खाली दबून मृत्य झाल्याची घटना घडलीय. सदरचा मुलगा हा कालपासून बेपत्ता होता. या घटनेने बुवापाडा परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोकणातील प्रसिद्ध अशी आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा तीन दिवस चालते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थित संपन्न झाली. मात्र आज दुसऱ्या दिवशी भराडी देवीच्या मंदिर परिसरात शुकशुकाट पहायला मिळाला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा यावर्षी मात्र भक्तांविना साजरी केली जात आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा. Fastag प्रणाली बंधनकारक करून प्रवाश्यांना ताटकळावं लागतंय, स्कॅनिंगमध्ये अडथळे आल्याने हे चित्र निर्माण झालंय. तर दुसरीकडे कॅश लाईन मात्र सुरळीत सुरू असल्याने fastag प्रणाली कार्यान्वित केलेल्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळतोय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात राज्यमंत्री मंडळाची कॅबिनेट बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत उद्या सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याच बरोबर गेल्या एक महिन्यापासून रिकामे असलेले विधानसभा अध्यक्ष पद यावर देखील चर्चा केली जाणार असल्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यातील निधोना शिवारात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मजुरांच्या घरात हायवा ट्रक घुसल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जन गंभीर जखमी झालेत,मयत मजूर हे उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहेत, जालना शहरापासून जवळच असलेल्या या शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या घरांमध्ये पाहाटे मुरूम घेऊन जाणारा ट्रक थेट शेड मध्ये घुसला या घटनेत शेड मध्ये राहणाऱ्या दोन मजुरांचा जागीच चिरडून मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या या ट्रक चालक विरोधात चंदंजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : पुलावरून बियरचे काचेची बॉटल खाली का फेकली, ती मला लागली असती एवढे म्हणणाऱ्या नोकरदार तरुणावर गुंडांचा हल्ला,
चाकू मारून त्याला गंभीर जखमी केले,
रुग्णालयात उपचारादरम्यान अंकित सिंह नावाच्या नोकरदारांच्या मृत्यू,
२८ फेब्रुवारीच्या रात्रीचा हल्ल्याचा सीसीटीव्ही वायरल झाल्याने गृहमंत्र्यांच्या नागपुरातील गुंडगिरीचा भीषण वास्तव समोर आला आहे,
तीन आरोपीना पोलिसांकडून अटक..
कल्याण -
1 मार्च रोजी कल्याण स्टेशन समोरील एका चप्पलच्या दुकानाला लागली होती आग ,
सात दिवसानी दुकान साफ सफाई करताना अज्ञात इसमाचा जळलेला मृतदेह आढळला,
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला ,
मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु
औरंगाबाद लॉकडाऊन संदर्भात निर्णय संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद .. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणच्या एस पी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त पत्रकार परिषद ..
वाशिम:
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वरोली गावातील नदीवर बैल पाणी पिण्यासाठी गेले 4 बैलांचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला. या 4 बैलांपैकी अरुण गावंडे यांच्या मालकीचे 3 तर दादाराव गावंडे यांचा एक बैल असून जवळपास 3 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
नाशिक : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते.
नाशिक -15 व्या मराठी विद्रोही साहित्य संमेलन आयोजकांची आज संध्याकाळी नाशिकमध्ये बैठक , नियोजनासह कोरोना बाबतही होणार चर्चा ,
25 आणि 26 मार्चला नाशिकमध्ये होणार आहे संमेलन, एकीकडे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित झाल्यानंतर मराठी विद्रोही संमेलनाबाबत काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं
नाशिकमध्ये प्रस्तावित असलेलं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं 26, 27 आणि 28 मार्चला होणारं साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : साहित्य संमेलनाबाबत आज महत्वाची बैठक. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पहाता साहित्य संमेलन घ्यावे की न घ्यावे याबाबत निर्णय होणार, पावणे अकरा वाजता साहित्य परिषदेची औरंगाबादेत पत्रकार परिषद, साहित्य संमेलन रद्द होण्याची शक्यता आहे.
मुंब्रा बायपास मार्ग आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सुरु असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मुंब्रा खाडीपुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम आज हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली.. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणी माफिया अवैध रित्या वाळू उपसा करत होते.. या कारवाईत 1 लाख 20 हजार किंमतीची वाळू जप्त केली.. तसेच एक जेसीबी आणि एक ट्रक पोलिसांनी जप्त केली.. या कारवाईत एकूण 57 लाख 75 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.. शालिजित सोनावणे, विनोद नागझरे आणि अन्य 3 जण अशी आरोपीची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून बाकी 4 आरोपी फरार आहेत.. सदर आरोपीवर 439, 379, 411 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत..
मुंबईतील १०० वर्षाच्या प्रभावी खेडकर यांना कोरोनाची लस देण्यात आली. बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर खेडकर आजींनी कोरोनाची लस घेतली. दरम्यान आतापर्यंत लस देण्यात आलेल्या त्या सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ठरल्या आहेत.
मास्क कारवाई : ठिकठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो, यावर अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दंड वसुलीच्या कारवाईत पारदर्शकता नाही, तसंच वसूल केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम ही आरोग्य सुविधांसाठीच वापरली जावी, असं असीम सरोदे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
टप्प्या-टप्प्यानं निर्बंध कठोर करणे किंवा लॉकडाऊन हाच पर्याय उरलाय असा इशारा नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिकरांना दिला आहे. दंड आकारूनही नागरिक ऐकत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागेल असं मांढरे यांनी म्हटलं आहे.
नागपूर जिल्ह्यात ११८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ४४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर ३८६ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.
दिवसभरात राज्यात १० हजार १८७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतही १ हजार १८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर, आता त्यांच्या नखाचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्या केमिकल अॅनॅलिसीसच्या रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे.
लग्न जमल्यानंतर कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू न वापरल्यामुळे चक्क लग्न मोडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी उच्चशिक्षित आहेत. मात्र, लावण्यात आलंल कुंकू ब्रँडेड नसल्याने ही मंडळी नाराज झाली आणि त्यानी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लग्न मोडणाऱ्या नवरा मुलगा, त्याचे आई वडील आणि काकावर नवरी मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबानींच्या घरासमोर स्फोटकांसह सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गूढ वाढलंय. शवविच्छेदन अहवालातूनही त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याआधी १२ ते २४ तास त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलंय.
आज मुंबईतल्या लसीकरण केंद्रात कोरोना लसीकरण होणार नाही. पुढील सूचना येईपर्यंत मुंबईत दर रविवारी लसीकरण बंद असणार आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
पार्श्वभूमी
या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा marathi.abplive.com
- प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतरही मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं रहस्य कायम, रासायनिक विश्लेषणासाठी नखाचं सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार, तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता
2. नाशिकमध्ये निर्बंध वाढवणे किंवा लॉकडाऊन हेच पर्याय, जिल्हाधिकारी सूरज मांढरेंचा इशारा, साहित्य संमेलनही लांबणीवर पडण्याची चिन्ह, तर औरंगाबादमध्येही लॉकडाऊनची शक्यता
3. पुढील आदेशापर्यंत मुंबईत दर रविवारी लसीकरण बंद, तर सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद
4. ठाणे-मुंब्रा बायपास आज वाहतुकीसाठी बंद, मध्य रेल्वेच्या खाडी पुलावर गर्डर टाकणार, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली
5. सध्याच्या परिस्थितीपेक्षा आणीबाणी बरी होती, तापसी-अनुराग, दिशा विरोधातल्या कारवाईवर सामनातून टीका
6. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी तब्बल अडीच हजार कोटींचा निधी जमा, चार मार्चपर्यंतची आकडेवारी विश्व हिंदू परिषदेकडून जाहीर, घरोघरी जाऊन निधी गोळा करणं बंद
7. पंतप्रधान मोदींची आज पश्चिम बंगालमध्ये रॅली, अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता तर सौरव गांगुलीही व्यासपीठावर उपस्थित राहणार का याकडं नजरा
8. कुख्यात गुंड गजा मारणेला पाचगणीतून अटक, सातारा पोलिसांची धडक कारवाई, चार साथीदारांसह गजाची पुण्याकडे रवानगी
9. हापूस आंब्याला 1 लाखांचा विक्रमी भाव, 100 वर्षातील ऐतिहासिक दर, उद्योजक राजेश अथायडेंकडून आंब्याची खरेदी
10. वाऱ्यावरची वरात, ग्यानबा तुकारामसारखी नाटकं गाजवणारे अभिनेते श्रीकांत मोघे पडद्याआड, वृद्धापकाळाने पुण्यात निधन