बडोदा/ गुजरात : बडोदा इथं सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपापूर्वी नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. कारण, संमेलनस्थळी सर्व स्टॉल धारकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

स्टॉल धारकांच्या आंदोलनामुळे स्टॉलवरील पुस्तक विक्रीही बंद करण्यात आली होती. आयोजकांच्या आडमुठेपणामुळे स्टॉल धारकांवर आंदोलनाची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, आयोजकांकडून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यामुळे स्टॉल धारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, अशी स्टॉल धारकांची तक्रार केली.

दरम्यान, स्टॉल धारकांच्या ठिय्या आंदोलनानंतर आयोजकांनी दिलगिरी मागितली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.