सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा बोगस डॉक्टर खिद्रापुरेला बेड्या
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 07:59 AM (IST)
सांगली/बेळगाव : सांगलीतील बोगस डॉक्टर बाबासो खिद्रापुरेला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. सोमवारी रात्री उशिरा सांगली पोलिसांनी खिद्रापुरेला बेळगावात बेड्या ठोकल्या. म्हैसाळमध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्यामुळे अनेक प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे. खिद्रापुरेला अटक करण्यासाठी सांगली पोलिसांची 5 पथकं रवाना झाली होती. त्यानंतर बेळगावमध्ये रात्री उशिरा सांगली पोलिसानी खिद्रापुरेवर कारवाई केली. काय आहे प्रकरण? सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासो खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं.