मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु
मुंबईच्या सांताक्रुझ पूर्वेत वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बंद खोलीत 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे.
Mumbai Crime News : मुंबईच्या सांताक्रुझ पूर्वेत वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बंद खोलीत 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती वडिलांकडून देण्यात आली आहे. मृतकाच्या वडिलांना पोस्टमोर्टमनंतर डॉक्टरांनी ही माहिती दिल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
मित्रासोबत भांडण झाल्याची शेजाऱ्यांनी दिली होती माहिती
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मृत रणजित हा त्याचा मित्र विक्कीसह वाकोल्यात राहत होता. दोघांमध्ये भांडण झाल्याबाबत शेजाऱ्यांनी माहिती दिली आहे. दुसऱ्या दिवशी विक्की सकाळीच बॅग घेऊन निघाला होता. त्यानंतर घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलीस विक्कीचा शोध घेत आहेत.
पत्नीचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पतीने उचललं टोकाचं पाऊल, लोणावळ्यात संपवल जीवन
पत्नीचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे घडली आहे. वीरेंद्र सिन्हा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सध्या हिंजवडी येथे नोकरी करत होते. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. 12 फेब्रुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून त्यांनी पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र नंबर ब्लॉक असल्याने संभाषण होऊ शकले नाही. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर टायगर पॉईंट येथून सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेतली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. वीरेंद्र सिन्हा हे हिंजवडीत कंटेनर सेल विभागात कार्यकरत होते.
























