मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आता लवकरच होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता, येत्या विस्तारात राज्यमंत्र्यांनाही स्थान दिलं जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. भाजपकडून या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नितेश राणे (Nitesh Rane), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), गणेश नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वेळच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) शिंदे गटातील नऊ जण आणि भाजपच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. सोबतच शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा होती. भाजपमध्येही प्रमुख नेत्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये या नाराजांना स्थान मिळू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपकडून प्रविण दरेकर, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात विस्तारात कोणाला संधी मिळू शकते?
- प्रवीण दरेकर
- संजय कुटे
- विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
- गणेश नाईक
- संभाजी पाटील निलंगेकर
- प्रसाद लाड
- योगेश सागर
- देवयानी फरांदे
- माधुरी मिसाळ
- जयकुमार गोरे
- प्रशांत ठाकूर
- मदन येरावार
- महेश लांडगे किंवा राहुल कुल
- निलय नाईक
- गोपीचंद पडळकर
- नितेश राणे
गेल्या वेळी 18 जणांनी शपथ घेतली
राज्याच्या मंत्रिमंडळाचा या आधी 9 ऑगस्ट रोजी विस्तार झाला. त्यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे मंत्रिमंडळ सध्या अस्तित्वात आहे.
पहिल्या मंत्रिमंडळात भाजपच्या खालील नेत्यांना स्थान मिळालं होतं,
- राधाकृष्ण विखे पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- चंद्रकांत पाटील
- विजयकुमार गावित
- गिरीश महाजन
- सुरेश खाडे
- रवींद्र चव्हाण
- अतुल सावे
- मंगलप्रभात लोढा