Sudhir Mungantiwar On Maharashtra Politics : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं (BJP-NCP) सरकार स्थापन करण्याची चर्चा 2017 साली झाली होती; असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान शेलार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. 2017 साली शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली. त्याचं प्रायश्चित्त भोगतोय, असं सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. 


2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता


मुनगंटीवार यांनी म्हटलं की, 2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चा देखील झाली. पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावं असं आमचं मत नव्हतं. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे. पण राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली आणि आता त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय, असं त्यांनी म्हटलं आहे. 


मुंबई आमची आहे असं आम्ही पण म्हणू शकतो


GSTसंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा पेट्रोल डिझेल वरचा कर हा केंद्रापेक्षा जास्त आहे.  पण खोटं काय बोलत आहेत की आमचा gst दिला नाही. gst हा डायरेक्ट राज्याच्या अकाउंटमध्ये जातो. हा जो न दिलेला gst आहे, तो राज्यांना 14 टक्के वाढीव दिला जाणारा परतावा आहे, जो कोरोना काळात सगळ्याच राज्यांचा गेला, आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो हे जे सांगता म्हणजे तुम्ही कर भरता का? मुंबईत सर्वच मोठ्या कंपनीचे ऑफिस आहे म्हणून IT रिटर्न मुंबईतून भरलं जातं. पण मनात येईल ते बोलायचं, केंद्राविरुद्ध भावना भडकवायच्या, देशात आणि मुंबईत फरक करायचा, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मागच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त मतं मिळाली आहे, मग मुंबई आमची आहे असं आम्ही पण म्हणू शकतो, असंही मुनगंटीवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


2017 मध्येच सांगायचं, पाच वर्ष का थांबलात? सत्ता स्थापनेची चर्चा झाल्याच्या शेलारांच्या दाव्यावर अजित पवारांचा सवाल


Ashish Shelar : भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची चर्चा 2017 साली झाली होती; आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट