Pankaja Munde : "उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या बाबतीमध्ये जी भूमिका आघाडी सरकारने घेतली होती, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. आम्ही एका छत्रपतींना राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवलं, तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेवर पाठवा. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Candidate) आहेत, त्यांना मान खाली घालायला लावू नये असा निर्णय घ्यायला पाहिजे, असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 


राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल असे शिवसेनेने म्हटले होते. परंतु, संभाजी राजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेनेने या सहाव्या जागेवर संजय पवार यांना उदेवारी जाहीर केली आहे. त्यावरून मराठा मोर्चाकडून संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारण्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. अनेक राजकीय नेत्यांतूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी द्यावी असे म्हटले आहे. 


संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवावे, ते छत्रपती आहेत त्यांचा मान राखायला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही आपले मत व्यक्त केले. 


"राज्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये माझा सहभाग असतो. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे मी तेवढ्याच स्थितप्रज्ञने बघत आहे. लोकांना गोड वाटेल अशा घोषणा करायच्या आणि त्यातून आपणही लोकप्रिय व्हायचं अशा पद्धतीचे राजकारण ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात झालं. त्यामुळे ओबीसी आरक्षण हे पक्षीय राजकारणामध्ये न ठेवता ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात आम्हाला पोटातून पीडा होते. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी आणि भविष्यासाठी त्यांचे राजकीय आरक्षण महत्त्वाचं आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.   


...तर सरकारला मदत करायला तयार
"मध्य प्रदेश सरकारने जे केलं ते पाहण्यासाठी सरकारने आपली लोकं मध्यप्रदेशमध्ये पाठवावीत. त्याचा अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात देखील ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, अशी माझी भूमिका आहे आणि यासाठी मी सरकारला मदत करायला तयार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 


एम्पिरिकल डेटा आणि जातीय जनगणना हा विषय वेगळा  


एम्पिरिकल डेटा आणि जातीय जनगणना हा विषय वेगवेगळा आहे. जातीय जनगणना व आरक्षण मिळत नाही हे शरद पवार यांना कोणीतरी चुकीचं सांगितलं असेल. त्या समाजातील लोक किती मागासलेले आहेत त्यावर आरक्षण ठरतं. त्यामुळे ओबीसी हा मागासलेला समाज असून त्यांना आरक्षणाची गरज आहे. ओबीसींची जातिनिहाय जनगणना व्हावी ही तर दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची देखील इच्छा होती. मात्र आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा महत्त्वाचा असून त्यावर काम होणे गरजेचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 


'माझं हृदय पिळवटून जातं'
ओबीसींना आरक्षणमिळाले नाही तर पुढच्या पिढ्यांवर परिणाम होईल. याचा विचार जरी केला तर माझं हृदय पिळवटून जातं. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर त्याचा परिणाम राजकारणावर किती होईल हे मला माहीत नाही. मात्र ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय होईल, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.





महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election 2022 : संभाजीराजे यांचा गेम कुणी केला?