Devendra Fadnavis on Sanjay Raut : कोण संजय राऊत, कोण आहेत ते. उलट सुलट बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आपल्या राज्यात रोजगार हमी योजना सुरु झाली. ती देशात वापरली गेली. आताच्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणघेणं नसल्याचेही पडणवीस म्हणाले.  या देशातील एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की त्यांना मुंबई पलीकडे काही दिसत नाही, असे म्हणत फडणविसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली.


भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या औसा विधानसभा मतदारसंघात शेतरस्ताच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा हे देखील उपस्थित होते. अभिमन्यु पवार यांनी एक हजार किलोमीटर शेतरस्ता, 300 किलोमीटर पक्का रस्ता, एक हजार शेततळे निर्मिती, एक हजार सिंचन विहिरी, एक हजार नाफेड कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, एक हजार वर्मीकंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, एक हजार जीवामृत निर्मिती प्रकल्प निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. 


पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रणालीचा सर्व लोकांना लाभ : भगवंत खुब्बा 


देशातील सर्व लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीमुळं लाभ झाला आहे. खतासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांची सोय मोदी सरकारने केली असल्याचे मत केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांनी व्यक्त केल. भारत देशातील सर्व शेतकरी बांधवांना कर्ज पुरवठा करण्याचे काम मोदी सरकार करणार आहे. राज्यासाठीची मागणी नोंदवली तर त्यापेक्षा जास्त पुरवठा केला जाईल असेही खुब्बा यावेळी म्हणाले. 


आमदार सत्तेत असला काय किंवा नसला काय फरक पडत नाही


शेतरस्त्याची कामे उत्तम झाली आहेत. शेतरस्ता हा महत्वाचा भाग आहे. हा औसा पॅटर्न तयार झाला आहे. हा 1000 किलोमीटरचा शेतरस्ता आहे. आमदार सत्तेत असला काय किंवा नसला काय यामुळं फरक पडत नाही. काम करण्याची इच्छा पाहिजे असेही उडणवीस यावेळी म्हणाले. सत्ताधाऱ्यांना असली कामं करता येत नाहीत, त्यासाठी कष्टच लागतात असे फडणवीस म्हणाले. 


जलयुक्त शिवारच्या कामामुळं शेतकऱ्यांना फायदा


जागतिक बँकेचे खूप पैसे आले आहेत. या सरकारला ते वपरता येत नाहीत असेही फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवारच्या कामामुळं पाणी साठवले. त्यामुळं मोदी सरकारने उसाचा शेतकरी वाचवला असल्याचेही फडणवीस म्हणाले. राज्यात तर अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. दूध दर, सोयाबीन याचे भाव पडू लागले त्यावेळी मोदी सरकानं अनुदान दिले असल्याचे फडणवीस म्हणाले.