Chitra Wagh on Ladki Bahin Yojana : महिलांनी महाविकास आघाडीच्या शिबिरात अर्ज करु नये. कारण, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत (Ladki Bahin Yojana) फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. महिलांचे अर्ज बाद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट आहे. अॅप, सेतू केंद्र किंवा पोर्टलवर स्वत: अर्ज भरण्याचे आवाहन वाघ यांनी केलं आहे. 


महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिबीरात महिलांनी अर्ज करु नये. कारण, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे वाघ म्हणाल्या.


काय आहे लाडकी बहिण योजना?


लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत.


अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?


सुरुवातीला लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. मात्र, आता आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो एवढी कागदपत्रे असतील तरीदेखील तुम्ही यासाठी अर्ज करु शकता.  योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.


पैसे कधी जमा होणार?


लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.


महत्वाच्या बातम्या:


CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार