Chandrakant Patil  : भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमची 13 जणांचा कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन सांगतो असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र आहे. त्याचे सगळ्याच पक्षात चांगले मित्र असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका मी मांडतो


राज्यामध्ये ज्या उलथापालथी होतात, त्याचा भाजपशी  काहीही संबंध नसल्याची भूमिका पाटील यांनी मांडली. सत्ता परिवर्तनाबद्दल मला काही माहित नाही. सध्या आम्ही राज्यातील 16 मतदारसंघामध्ये काम करत आहोत. राज्यातील घटनांशी आमचा काही संबंध नसल्याचे पाटील म्हणाले. शरद पवार आणि नारायण राणे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं याबद्दल मला काही माहित नाही. महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, पण आमच्या सगळ्या नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत असे पाटील म्हणाले. आपण एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे, काही गोष्टी सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस मला म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रत्येक गोष्टीचा पुरेसा आधी आणि पुरेसा नंतर विचार करतो. सकाळी मी हे पेपरमध्ये वाचलं की उद्धव ठाकरे यांची एक्सिट आहे म्हणून. पण मला वाटत नाही की कोण आपली इतकी बदनामी करुन घेईल. हा अभ्यासाचा विषय असल्याचे पाटील म्हणाले.      


मोहीत कंबोज यांचे सगळ्याच पक्षात मित्र


मोहीत कंबोज सगळ्यांचाच मित्र आहे. तो एकनाथ शिंदे यांचा देखील मित्र आहे. मोहित कंबोज तिकडे गेल्याबद्दल मला काही माहित नसल्याचे पाटील म्हणाले. दिसला असेल तर त्याचे सगळ्याच पक्षात मित्र आहेत असे पाटील म्हणाले. संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचे ते मला माहिती नाही. ते सकाळी एक बोलतात दुपारी वेगळचं म्हणतात असेही पाटील म्हणाले. 


विधानपरिषद आणि राज्यसभेच्या विजयानंतर लोकांना खूप आनंद झाला आहे. गावोगावचे लोक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला येत आहेत. अपक्ष जे आमच्याबरोबर आहेत. त्यांना विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दबाव आला असल्याचे पाटील म्हणाले. मला जे सांगायचे ते मी लगेच सांगतो. एवढा वेळ लावत नाही. पण काहीतरी चाललय असेही पाटील म्हणाले. राज्यामध्ये ज्या उलाथापालथी सुरु आहेत. त्याबाबत आपल्यालाला काहीही माहित नाही. या गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे, असे म्हणत पाटील यांनी सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करत तटस्थ भूमिका घेतली.