Vidhansabha Elections Solapur BJP News : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Elections) भाजपने (BJP) आपल्या 99 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर (BJP candidates first list) केली आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या काही आमदारांची धाकधूक वाढली आहे. कारण त्यांचा उमेदवारांच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळं उमेदवारी मिळणार की विद्यमान आमदारांची पलटी होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.
'या' आमदारांची धाकधूक वाढली
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3 ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh), सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र पंढरपूर, बार्शी आणि माळशिरसमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. पंढरपूरमध्ये समाधान आवताडे हे भाजपच विद्यमान आमदार आहेत. तर बार्शीत भाजप पुरुस्कृत राजेंद्र राऊत हे आमदार आहेत, त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच माळशिरसमध्ये राम सातपुते हे भाजपचे विद्यमान आणदार आहेत. या तिन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळं या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
भाजपाने 99 जागांवर केली उमेदवारांच्या नावाची घोषणा
भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील. दरम्यान, भाजपने अनेक विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा न केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. या आमदारांचा पत्ता कट होणार? नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या: