मुंबई: महायुतीसोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन करणे भाजप केंद्रीय नेतृत्वाचा अजेंडा असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी भर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पातळीवरील वाद टाळा असे निर्देश केंद्रीय नेतृत्वाचे भाजप नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. याआधी राज्यात सुरू असलेल्या महायुतीतील नेत्यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) आमदारांना सूचना दिल्या होत्या.


अशातच आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीसोबत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे मनोमिलन करणे भाजप नेतृत्वाचा अजेंडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी आता भर दिला जात आहे.राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यासाठी भाजप सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आपल्या आमदारांना सूचना दिल्या होत्या.


महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा


सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, अंतिम टप्प्यातली कामं मार्गी लावा अशा सूचना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमदारांना केल्या आहेत. महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाजपच्या नेत्यांना दिला. मुंबईतल्या सागर निवासस्थानी आज फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. गणपती बाप्पाच्या प्रसादासोबतच फडणवीसांनी आपल्या नेत्यांना कानमंत्रही दिला होता.


सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, अंतिम टप्प्यातली कामं मार्गी लावा अशा सूचना फडणवीसांनी आमदारांना केल्या आहेत.