लातूर : लातुरात माहिती अधिकाराचा वापर केल्याचं भाजप कार्यकर्त्याला महागात पडलं आहे. माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागवल्याच्या रागातून भाजप कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांचा खून करण्यात आला आहे. गावचे सरपंच विश्वास जाधव यांचा पुतण्या सुरेश जाधवने या राजेंद्र जाधववर चाकूनं वार केल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्यातील शिरोळ वांजरवाडा येथे आज सकाळी हा प्रकार घडला आहे.
आज सकाळी भाजप कार्यकर्ते राजेंद्र जाधव गावातील बस स्थानकासमोर चहा पीत असताना सुरेश जाधवने राजकारण आणि माहिती अधिकारात माहिती मागवत असल्याचा राग मनात ठेवून चाकूने वार केला. वार वर्मी लागल्याने काही वेळातच राजेंद्र जाधव यांचा मृत्यू झाला आहे .
या घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनस्थळाकडे धाव घेतली. त्यानं मृतदेहावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं. ही घटना झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे, मात्र उर्वरित सात आरोपीना अटक होत नाही तोवर प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
लातूरात गावातील राजकारण आणि सत्तासंघर्ष एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत टोकदार झाले आहेत. आम्ही सत्तेवर असताना माहिती अधिकारात माहिती मागवून त्रास का देतो. या मानसिकतेतून हा खून झाला आहे.
माहिती अधिकाराचा वापर केल्याचा राग, लातुरात भाजप कार्यकर्त्याचा खून
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
22 Jul 2019 02:55 PM (IST)
आम्ही सत्तेवर असताना माहिती अधिकारात माहिती मागवून त्रास का देतो, या मानसिकतेतून हा खून झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -