मुंबई: नुकतेच राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात केवळ 56 टक्के पगार देणार असल्याचे जाहीर करताच एस टी कर्मचाऱ्यांनी याला कडाडून विरोध दर्शविला आहे. नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला जातो. मात्र, एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त 56% झालेला आहे. निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालेला आहे. एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित करत आहेत. तसेच सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. जर सरकारने हा निर्णय बदलला नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.

Continues below advertisement


नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला जातो. मात्र एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त 56% झालेला आहे. निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालेला आहे. एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर टीका केली आहे. आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारला विचारला आहे. 


एस टी कर्मचाऱ्यांची कैफियत 


- एस टी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता अजून दिलेला नाही
- भत्ता एकरकमी द्या असे हायकोर्टाचे आदेश असूनही भत्ता नाही
- सध्या कर्मचाऱ्यांचा 56 टक्के महागाई भत्ता थकीत 
- मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच दिला, इतिहासात पहिल्यांदाच पगारात कपात
- कर्मचाऱ्यांचे पगार सात तारखेला होत नाहीत, कधी 8, कधी 9, कधी 10 तारखेला होतात.
- एसटी दैनंदिन फायद्यात, रोज सरासरी 22 कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला 660 ते 700 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न गेलं आहे. 
- एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला 440 कोटी रुपये लागता, उत्पन्न 700 कोटी असताना पगार का नाही
- ज्येष्ठ नागरिक, महिला अशा विविध 36 प्रकारच्या लोकांना एसटीच्या तिकिटांत सवलती, त्या सवलतीची भरपाई सरकार करत नाही
- घरभाडं तालुकास्तरावर 8 टक्के असूनही 7 टक्केच दिले जातेय, पण तेसुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर दिलं जातं.