मुंबई महापालिकेसाठी सेना-भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच मुंबई महापालिकेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. याला प्रत्यूत्तर देण्यासाठी भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप करत शिवसेनेनं एक पुस्तिकाच छापली आहे. ही पुस्तिका उद्या नागपुरात प्रसिद्ध करण्यात येईल.
महापालिकेचे प्रमुख आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीच्यावर आयुक्त आणि नगरविकास विभाग असून या विभागाचे प्रमुख मुंख्यमंत्री आहे. तर महापालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्याला जबाबदार कोण, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी शिवसेनेने काल केली होती.
मुख्यमंत्रीसाहेब या घोटाळ्यांना जबाबदार कोण?, शिवसेनेचा सवाल
युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र झाले आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचारही घेतला होता.
25 वर्षांपासून भाजप शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतय : सामना
भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू : मुख्यमंत्री
शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार