Akola : अकोला (Akola)  जिल्हा नियोजन समितीच्या सभेत प्रचंड राडा झाल्याची घटना घडली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh,) एकमेकांवर धावून गेले आहेत. दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. भर बैठकीतच राडा झाल्यानं या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दलित वस्तीच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख या दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती. भर बैठकीत दोन्ही आमदारांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित अधिकारी मंत्री आणि आमदारांनी दोघांना आवरल्यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला. यावेळी दोन्ही आमदार ऐकमेकांवर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. 

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

शिंदेंसोबत सूरतला गेले, पण गुवाहाटीला जाण्यापूर्वीच ठाकरेंकडे परतले; नितीन देशमुख ठरले पात्र