Water Storage in Maharashtra : सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तसेच मुसळधार पावसामुळं शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी (Raiver) आणि धरणांच्या (Dam) पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा आहे.


यावर्षी राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा काही ठिकाणी फटका देखील बसला आहे. मात्र, आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील  लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा झाला. मागील वर्षी याच काळात पाणी प्रकल्पाचा पाणी साठा हा 67 टक्क्यांवर होता. त्यामानानं यावर्षी पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. 


कोणत्या विभागातील प्रकल्पांमध्ये किती पाणीसाठी शिल्लक


अमरावती विभागातील धरणांमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठी 84 टक्क्यांवर गेला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये आत्तापर्यंत 76 टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठी, तर नाशिक विभागातील धरणांमध्ये 83 टक्के पाणीसाठी झाला आहे. तसेच पुणे विभागातील धरणांमध्ये 88 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, राज्यात अद्यापही पाऊस सुरु आहे. या सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


परतीच्या पावसाचा प्रवास लांबणीवर


नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याची आम्हाला अपेक्षा होती. मात्र, सध्या मान्सून लवकर माघारी जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे  महासंचालक मृत्युंजय महापात्रा ( Mrutyunjay Mohapatra) यांनी दिली आहे. हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 25 ऑगस्ट रोजी हवामान खात्यानं 17 सप्टेंबरच्या सामान्य तारखेपूर्वी नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, मान्सूनचा परतीचा प्रवास आता लांबणीवर गेला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: