भिवंडी : भिवंडीत चोरींच्या घटनेत वाढ होत असून शहरातील निजामपुरा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. एकाच दिवशी निजामपूर परिसरातील 12 ठिकाणी घरफोड्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी केलेल्या या घरफोडीत पाच लाखांचा माल लंपास केला आहे. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस या चोरट्यांचा कसून तपास करीत आहे. स्थानिकांनी मात्र पोलिसांच्या होत असलेल्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
भिवंडी शहरातील निजामपुर परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत 12 ठिकाणी घरफोडी केली. यात पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून चोर्यांच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निजामपुर परिसरात ज्या घरामध्ये घरफोड्या झाल्या आहेत ते सर्व कुटुंब पिकनिकसाठी महाबळेश्वर आणि अजमेरला गेले होते. या परिवारांतील सदस्यांना आज घरी आल्यावर त्यांनी आपल्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं. तसेच कपाटातील महागड्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या होत्या.
हा परिसर निजामपूर पोलिस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही एकाच रात्री 12 ठिकाणी घरफोड्या झाल्याने पोलिसांच्या रात्रीच्या पेट्रोलिंग वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या परिसरातील ही पहिली घटना नाही. याआधी देखील घरफोड्या झाल्या आहेत मात्र अजूनही त्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
भिवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी 12 ठिकाणी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2019 10:11 PM (IST)
भिवंडी शहरातील निजामपूर परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत 12 ठिकाणी घरफोडी केली. यात पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून चोर्यांच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -