मोठी बातमी : भिगवण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, तरुणीनं घेतला यू टर्न, कोर्टात नेमकं काय घडलं?
Bhigwan Case : भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Bhigwan Case News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणात मोठी अपटेड समोर आली आहे. भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कोर्टात मुलगी नेमकं काय म्हणाली?
मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
संबंधित तरुणीने शपथपत्रात काय म्हटलं होतं?
संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असं म्हटलं आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. दरम्यान, मुलगा आणि मुलगी भिगवममधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
भिगवण घटनेतील मुलीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे
भिगवण घटनेतील मुलीला सुधार गृहात तिची रवानगी करण्यात आली आहे. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण घटनेतील युवतीला आज कोर्टात हजर केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला. जबाब नोंदवल्यानंतर मुलीचे मेडिकल करून पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय, पोलीस सूत्रांची माहिती, तरुणाबद्दल नवी अपडेट समोर
























