Bhaskar Jadhav :  दहीहंडी (Dahihandi) हा आत्मविश्वास वाढवणारा उत्सव असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केले. काळानुरुप सणांच्या बाबतीत चंगळ वाढत गेली आहे. सणांचे महत्व वाढवण्यापेक्षा स्वतःचे महत्व वाढवण्याकडे लक्ष दिले जात असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटाला लगावला. तुमच्याकडे खोक्यातले पैसे नाहीत ना? असा टोला देखील नाव न घेता भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला आहे.

केवळ बारा मिनिटांच्या भाषणात भास्कर जाधवांनी व्यासपीठ गाजवले  

केवळ बारा मिनिटांच्या भाषणात भास्कर जाधवांनी व्यासपीठ गाजवले आहे. चिपळूणमधील निष्ठावंताच्या दहीहंडीतल भाषण लक्षवेधी ठरलं आहे. सगळे सण शिवसेनेने सुरु केले आहेत. ज्यावेळी सुरु केले तेव्हा शिवसैनिकांना खंडणीखोर म्हणून हिणवले गेले होते. विरोधी पक्षाने वर्गणी मागितली की त्याला गुरुदक्षिणा नाव देण्यात यायचे. चिपळूणमधील दहीहंडी उत्सवात भास्कर जाधवांनी जुनी आठवण करुन दिली आहे. सध्या सणांचे महत्व वाढवण्यापेक्षा स्वतःचे महत्व वाढवण्याकडे लक्ष दिले जात असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटाला लगावला. तसेच तुमच्याकडे खोक्यातील पैसे आलेत का? असा नाव न घेता भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला.

तुमच्या मागे खोक्यातले पैसे नसले तरी लोकांचा आशीर्वाद

आज काही लोक शिवसेनेपेक्षा मोठी दहीहंडी साजरी करत असतील, गणपती उत्सव साजरा करत असतील पण खऱ्या अर्थाने ही परंपरा सुरु करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झाली आहे. तुमच्या मागे खोक्यातले पैसे नसले तरी लोकांचा आशीर्वाद आहे. राज्यात आज विचित्र आणि गंभीर चित्र आहे. दहिंदही फोडत असताना ज्याच्या खांद्यावर मी पाय ठेवून दहीहंडी फोडतोय तो काहीही झालं तरी खांदा बाजूला करणार नाही हा विश्वास असायला हवा असे भास्कर जाधव म्हणाले. 

आमचा पक्ष जात पात पाहणारा नाही 

आमचा पक्ष जात पात पाहणारा नाही असेही भास्कर जाधव म्हणाले. श्री कृष्णाने ज्या पद्धतीने दहीहंडी फोडून आपल्या सहकाऱ्यांचे तोंड गोड केले त्याप्रमाणे शिवसेना तुमचे तोंड गोड केल्याशिवाय राहणार नाही असे भास्कर जाधव म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

भास्कर जाधव एकनाथ शिंदेंवर घसरले, शंभूराज देसाई, योगेश कदम चांगलंच भडकले; ठाकरे गटाला इशारा