Bhaskar Jadhav: शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आज (17 जुलै) विधानसभा अधिवेशनामध्ये सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये (राज्याच्या विविध समस्या अंतर्भूत करून समस्या माडंलेल्या असतात आणि संबंधित मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत असे संकेत आहेत) बोलताना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. यावेळी भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पावित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांचे संभावना दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका सुद्धा केली. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वत: उत्तरे द्यावीत, असा टोला सुद्धा लगावला. अध्यक्ष स्वतःला ज्ञानी समजतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Continues below advertisement

सातत्याने ठाकरेंवर टीका करायला लाज वाटत नाही का?

भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष आपण स्वत: सरकारला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत ते दाखवून धन्यता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. कामकाजाची परंपरा यांनी धुळीस मिळवल्याची टीका त्यांनी केली. 2014 पासून एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री असल्याचे सांगत मुंबईमध्ये होणाऱ्या विकासकामांवरून मेहरबानी करत नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले. सातत्याने ठाकरेंवर टीका करायला लाज वाटत नाही का? अशी विचारणा केली.आम्हाला एरवी शिका म्हणणारे अध्यक्ष दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा स्थितीत आहेत. उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत. मात्र अनेक लोकांच्या विषयाला हात न घालता उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केल्याचा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला. 

Continues below advertisement

खिचडी घोटाळ्याचा उल्लेख सुद्धा भास्कर जाधव यांनी करत एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच प्रहार केला. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री खिचडी घोटाळ्यावर बोलतात. मात्र, मुळात यांचाच कंत्राटदार संजय माशेलकर हा याचा मास्टरमाईंड आहे आणि त्याला अटक केली गेली नाही तो यांच्याच पक्षामध्ये असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारमध्ये हे सुद्धा होते मग काय करत होते? अशी विचारणा सुद्धा भास्कर जाधव यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या