Bhaskar Jadhav On Uday Samant : पालकमंत्री एक नंबरचा बदामश आहे. खोटं कसं बोलाव हे उदय सामंतांकडून शिकावं, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केली. उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये त्यांनी खोटं भाषण केले. मुळात ज्या निधीचा उल्लेख केला तो निधी विक्रांत जाधवने आणलेला असल्याचे जाधव म्हणाले. ते चिपळूनमध्ये बोलत होते.
सामंत तुम्ही नक्की कोणामुळे मोठं झालात?
अजित पवार यांचे नाव घेतलं असतं तर तुम्ही किती इमानदार ते स्पष्ट झालं असतं. मात्र भाषण करताना जो नेता समोर असेल त्यांचे कौतुक उदय सामंत करतात. सामंत तुम्ही नक्की कोणामुळे मोठं झालात? असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी केला आहे. वाशिष्ठी डेअरी कोकणातील शेतकऱ्यांचं हित करेल असे वाटले होते. मात्र वाशिष्ठी डेअरी मधून नुसती मलाई निघत असल्याची टीका जाधव यांनी सामंत यांच्यावर केली. .हा पैसा आला कुठून? असा सवाल देखील जाधव यांनी केला. असाच पैसा वाटून समाज विकला जात असेल तर भविष्यात प्रामाणिक कार्यकर्ता मिळणार नाही असे भास्कर जाधव म्हणाले.
पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर पक्षप्रमुखांसह सर्वाना परखड भूमिका घ्यावी लागेल
पक्ष प्रमुखांसह सर्वांना परखड निर्णय घेण्याचा सल्ला देखील जाधव यांनी दिला. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कुठलाही आमिष देऊन फोडणं किंवा विकत घेणे कोणत्याही बापजाद्याला शक्य नव्हतं. मात्र आज तोच कार्यकर्ता सहजा सहजी पाघळतोय हे पाहून दुःख होतं असल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर पक्षप्रमुखांसह सर्वाना परखड भूमिका घ्यावी लागेल. आम्ही नेते म्हणून मिरवतो तेव्हा सामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आम्ही कुठे असतो यावर देखील भूमिका मांडावी लागेल असे जाधव म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्याचे स्वप्न अनेकांनी बघितलं
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्याचे स्वप्न अनेकांनी बघितलं. पण या बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत, त्यामुळं हा पक्ष कोणालाही सहजा सहजी संपावता येणार नाही पण, केवळ बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद आहे म्हणून सगळं पहिल्यासारखं होईल असे आम्ही नेत्यांनी समजून चालणार नाही असे म्हणत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंसह नेत्यांना इशारा दिला आहे. आम्ही नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात जाऊन पुन्हा पक्ष उभा करण्यावर लक्ष दिला पाहिजे तरच भविष्य आहे. कार्यकर्ता खचला आहे, त्यांना बळ द्यावे लागेल. त्याला उभा करावं लागेल तरच हे घडेल नाहीतर बिघडेल. कितीही म्हटलं तरीही निवडणूका पैशांच्या झाल्या आहेत हे नाकारून चालणार नाही. केवळ भावनिक आवाहन करुन, प्रामाणिक पणाची हवा देऊन काही उपयोग नाही. नेत्यांनी बसून यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. विरोधक खर्च करतात ही चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ते दिवस गेल्याचे जाधव म्हणाले.
पक्षाचे पदाधिकारी अगोदरच विकले गेले
कार्यकर्त्यांना उपदेश दिला म्हणजे झालं नाही. आम्हाला जबाबदारी घेण्यासाठी दोन पावलं पुढं यावेच लागेल असे जाधव म्हणाले. पक्षाचे पदाधिकारी अगोदरच विकले गेले असे म्हणत भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप केला. नेते म्हणवून घेणाऱ्यांनी उमेदवारी जाहीर करुन घेतली आणि एन वेळी माघार घेतली. एन वेळी उमेदवार मिळेना झाला, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.