Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कुठेही गेले तरी दुसऱ्याच्या नावाने शिव्या देतो. गाढवाला गुळाची चव काय? अशी रामदास कदमांची स्थिती आहे, रामदास कदम यांनी चांगली चरित्र वाचावी असे जाधव म्हणाले. 

रामदास कदम याला मी एकेरीच बोलणार 

रामदास कदम याला मी एकेरीच बोलणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. माझा मुलगा कष्ट करून मोठा झाला आहे. तुम्ही हप्तेखोर, हप्ते खाता, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला. मुंबईतील बार चा उल्लेख करतजाधवांनी पुन्हा टीका केली. रामदास कदम हा माणूस आहे की कोण हेच कळत नाही. रामदास कदम ही विकृती असल्याचे जाधव म्हणाले. खेडमधील सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली. 

रामदास कदमने सख्ख्या भावाला जेलमध्ये टाकलं होतं

सख्या भावाच्या घरात दिवाळीचा दिवा लागला नाही. रामदास कदमने सख्ख्या भावाला जेलमध्ये टाकलं होतं. रामदास कदम यांची पापं एवढी मोठी आहेत की त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल असे भास्कर जाधव म्हणाले. खाडी पुलावरील कर्जी पुलाचा उल्लेख करताना रामदास कदम यांचा मुर्ख म्हणून उल्लेख केला. टेंडर निघलेल्या पुलाची अंदाजपत्रक करण्याच्या सूचना रामदास कदमांनी दिल्या असे म्हणत जाधवांनी कदमांवर टीका केली. 

आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिलस होता. त्यामुळं राजकीय नेत्यांना कमी वेळात अनेक ठिकाणी हजेरी लावून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. आजच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील देखील राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचार सभा घेतल्या. यामध्ये भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या टीकेवर रामदास कदम यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut: इकडं मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गटातून भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद अन् संजय राऊत कडाडले! तिकडं शिंदे सुद्धा 'मनसे' बोलले..