मुंबई : 103 दिवस तुरुंगात राहून परतलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार का याची उत्सुकता आहे. राज्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग करण्यात राऊतांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या. राऊतांची ईडी चौकशी सुरु झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राऊत यांना पत्र लिहून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर राऊत आता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याची उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. या यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या यात्रेमध्ये संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत दिसणार आहे 11 तारखेला नांदेड येथे होणाऱ्या सभेला आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे. सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्यामुळे छातीत मोठया प्रमाणत संसर्ग झाला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिराला सहभागी झाले होते. मात्र चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. शिबिरात देखील पवार यांनी फक्त पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत.
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. नांदेडमधील नायगावातल्या कापशी गुंफा येथेून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. आज त्यांची जाहीर सभाही होणार आहे. नांदेडमधील नायगावातल्या कापशी गुंफा येथेून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून त्याच्यांशी संवाद साधत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :