मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता महायुतीमध्ये शह-काटशहाचं राजकारण रंगण्याचं चित्र आहे. एस टी महामंडळातून महाव्यवस्थापकीय पदावर माधव काळे यांची तात्काळ नियुक्ती करा असा आशयाचं पत्र महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकरांना लिहिलं आहे. माधव काळे यांची वर्षभरासाठी करार पद्धतीने नियुक्ती करण्याच्या सूचना गोगावले यांनी दिल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माधव काळे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. आता भरत गोगावले यांच्या पत्रानंतर भाजपचे पडळकर, खोत आणि सदावर्तेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
सदावर्ते, पडळकर, खोत यांच्या विरोधामुळे माधव काळे यांची एसटी महामंडळातून महाव्यवस्थापकीय पदावरून गच्छंती झाली होती. आता त्याच माधव काळे यांची तात्काळ नियुक्ती करावी अशा सूचना भरत गोगावले यांनी दिल्या आहेत.
गोगावले यांनी दिलेल्या या पत्रात माधव काळे यांची एक वर्षासाठी करार पद्धतीने महाव्यवस्थापक पदावर तत्काळ नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, माधव काळे यांच्या नियुक्तीचे पत्र भरत गोगावले यांनी दिल्याच्या माहितीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी अनुमोदन दिलं आहे. एबीपी माझाला त्यांनी ही माहिती दिली.
माधव काळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी माधव काळे यांच्यावर एसटी चालक वाहक पदभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच 450 कोटींचे ब्रिक्स स्वच्छता कंत्राट, 90 कोटींचे रॉलटा कंपनीचे कंत्राट घोटाळा केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
सदावर्ते-खोत-पडळकर काय भूमिका घेणार?
ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी तर माधव काळे यांना नियुक्ती मिळाल्यास लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतरही आता महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी माधव काळे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
माधव काळे यांच्या संबंधी भरत गोगावले यांच्या तत्काळ नियुक्तीच्या पत्रावर भाजपचे पडळकर, खोत आणि सदावर्ते काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.
ही बातमी वाचा :