Bharat Gogavale on Raj Thackeray :  मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी  जशास तसे उत्तर प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणजे ऊठ दुपारी आणि घे सुपारी मधले आहेत, असे म्हणत गोगावले यांनी राज ठाकरेंवर टीका केली. शिंदेंना उपमा देणारे राज ठाकरे यांनाच त्यांची उपमा लागू पडते असेही गोगावले म्हणाले. तुम्ही एकत्र आलात म्हणजे तुम्ही जग जिंकू शकत नाही, असा टोलाही गोगावलेंनी राज ठाकरेंना लगावला.

Continues below advertisement

एकनाथ शिंदे यांना चाटूगिरीची उपमा देणाऱ्या राज ठाकरे यांनाच ही उपमा लागू पडते 

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांचा शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यांच्यामुळे तुम्हाला शिवसेना सोडावी लागली त्यांचेच पाय धरणारे राज ठाकरे आता आमच्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. राज ठाकरे हे उठ दुपारी आणि घे सुपारी यामधील असून ज्यांच्यामुळं तुम्हाला पक्ष सोडावा लागला त्यांच्याच जवळ जाऊन ते आता हात मिळवणी करत आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना चाटूगिरीची उपमा देणाऱ्या राज ठाकरे यांनाच ही उपमा लागू पडते अशी टीका गोगावले यांनी केली. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याने त्यांनी आभाळाला हात लागल्यासारखे आणि जग जिंकल्यासारखे वागू नये असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?

मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी, चाटुगिरी कारावी, असे म्हणत एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं. 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या, असे राज ठाकरेंनी म्हटले. तसेच यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी EVM च्या मुद्यावरुन सरकारवरही टीका केली होती.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही, राज ठाकरेंबद्दल आदर पण एकनाथ शिंदेंबद्दल बोलाल तर... निलेश राणेंचा हल्लाबोल