एक्स्प्लोर

Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी

Bhandara Sand Mining Scam : भात उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून (Bhandara News)आता एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाचे धाबे दणाणून सोडणारी बातमी समोर येत आहे.

Bhandara Sand Mining Scam : भात उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून (Bhandara News)आता एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाचे धाबे दणाणून सोडणारी बातमी समोर येत आहे. तब्बल 72 कोटी रुपयांचा दंड डोक्यावर असतानाही, एका वाळू माफिया कंपनीला नियमबाह्यरित्या वाळू घाटाचा लिलाव (Bhandara Sand Mining Scam) दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक बैठकीत हा महाघोटाळा समोर आल्यानं महसूल आणि खनिज विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीत भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी हा मुद्दा लावून धरत प्रशासनाचा खोटारडेपणा उघडा पाडला.

Bhandara Sand Mining Scam : राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नेत्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात एकी

विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नेत्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात एकी दाखवली. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे, शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. संबंधित घोटाळेबाज एजन्सीचे डिपॉझिट तात्काळ जप्त करा, दंडाची रक्कम वसूल करा आणि त्या एजन्सीवर थेट पोलिसात FIR दाखल करा, अशा सूचना सर्वपक्षीय आमदारांनी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांना केल्यात.

दरम्यान, आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात, नियमबाह्य करारनामा करणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांवर गाज पडणार आणि या 700 कोटींच्या वाळू उपशाची चौकशी कशी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Bhandara News : वाळू घाटाचा 72 कोटींचा दंड असतानाही नियमबाह्यरित्या वाळू घाटाचा करारनामा

दरम्यान, याबाबत जिल्हा खाणीकरणाधिकारी सचिन वाढवे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. तर, या महाघोटाळ्याप्रकरणी आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर, अविनाश ब्राह्मणकर यानी वाळू घाटाचा 72 कोटींचा दंड असतानाही नियमबाह्यरित्या वाळू घाटाचा करारनामा केल्याप्रकरणी त्या कंपनीचं संपूर्ण डिपॉझिट जप्त करावं आणि दंडात्मक कारवाईसह एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

Sand Mining Scam : प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा 'गोरखधंदा'?

दरम्यान, ज्या एजन्सीवर यापूर्वी तब्बल 72 कोटी रुपयांचा दंड ठोकण्यात आला होता, त्याच एजन्सीसोबत भंडाऱ्यातील अधिकाऱ्यांच्या मेहरबानीनं नियमबाह्य करारनामा करण्यात आला. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी बैठकीत अत्यंत गंभीर आरोप केला आहे. संबंधित एजन्सीने तब्बल 15 लाख ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा करून शासनाचा 700 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतका मोठा दंड थकीत असतानाही संबंधित एजन्सीला करारनामा कसा करून देण्यात आला? यावरून प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा 'गोरखधंदा' सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget