Bhandara News : अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हक्काचं आणि परवडणारं घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विभागानं (Housing Department) भंडाऱ्यात 224 फ्लॅट्सची सुसज्ज वसाहत उभारली आहे. मलेशियातील अत्याधुनिक 'माय वन टेक्नॉलॉजी'चा (My One Technology),वापर करून उभारलेली ही भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील पहिलीच बिना विटांची वसाहत आहे. ग्राउंड प्लस तीन मजल्यांच्या एकूण 7 विंग्समध्ये ही वसाहत तयार झाली असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते याचं थाटात लोकार्पण होणार आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळं भंडाऱ्यातील अल्प उत्पन्न घटकांतील अनेक कुटुंबांचं हक्काच्या, मजबूत आणि अत्याधुनिक घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.
Bhandara News : अत्याधुनिक 'माय वन टेक्नॉलॉजी'चा, वापर भंडारा जिल्ह्यातील पहिलीच बिना विटांची वसाहत
दरम्यान, एकूण 224 पैकी 200 फ्लॅट्सवर पीएम आवास योजनेंतर्गत विशेष सबसिडी मिळणार आहे. म्हाडाची मूळ किंमत 11,98,934 रुपये असून सबसिडीनंतर हा फ्लॅट नागरिकांना अवघ्या 9,48,934 रुपयांत उपलब्ध होईल. तर पती-पत्नीचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असणारे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतील. त्यामुळे गरिबांच्या घराचं स्वप्न आतासाकार होणार असूननागरिकांनामोठादिलासामिळणार, अशीमाहिती म्हाडा गृहनिर्माण वसाहतचे अभियंता रविना नरवरिया यांनीदिली.
MHADA lottery 2026: पुण्यात 11 लाख ते 64 लाख रुपये किमतीची म्हाडाच्या चार हजार 462 घरांसाठी सोडत जाहीर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या पुणे मंडळाने संगणकीकृत सोडतीद्वारे 4,462 परवडणारी घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या घरांच्या किमती 11 लाख ते 64 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. ही घरे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येतात. म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Pune MHADA lottery 2026: 15 सप्टेंबर करतायेईल अर्ज
ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. तसेच, अनामत रकमेचा (Earnest Money Deposit) ऑनलाइन भरणाही 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारला जाईल, असे म्हाडाने सांगितले. म्हाडाच्या माहितीनुसार, अर्जदार 16 सप्टेंबर 2026 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करू शकतात. स्वीकृत अर्जांची तात्पुरती यादी 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. या तात्पुरत्या यादीबाबतचे दावे आणि हरकती 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करता येतील.
इतर महत्वाच्या बातम्या
