Bhagirath Bhalke : सध्या सोलापूर जिल्ह्यात सत्तेचा वापर करून सुरु असलेली दडपशाही थांबवण्यासाठी आम्ही विरोधातील मंडळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनी पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता ते शिवसेने प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी भाजपवर टीका केली.उद्या भगीरथ भालके यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

सत्ताधाऱ्यांकडून सुरु असलेली पिळवणूक रोखण्याची ताकद सत्तेतील एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे असे म्हणत भगीरथ भालके यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. त्यामुळेच आम्ही उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले. दरम्यान 2029 च्या विधानसभेला पंढरपूरचा आमदार हा शिंदेंच्या विचाराचाच असेल असे सांगत भगीरथ भालके यांनी 2029 ला भाजप शिवसेना युती होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

दोन वेळा भगीरथ भालकेंचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव

उद्या एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके भगीरथ भालके अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकारी पंढरपूर मध्ये शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पंढरपूर विधानसभेची जागा ही भाजपकडे असून येथून आमदार समाधान आवताडे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. दोन्ही निवडणुकीत अवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. याही वेळी भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. यानंतर झालेल्या पंचायतराज निवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी मनसे एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा सर्व पक्षांना एकत्रित करत भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी स्थापन केली होती. 

Continues below advertisement

तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतही शिवसेनेच प्रवेश करणार

उद्या प्रवेश करणारे अनिल सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून त्यांनीही विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढविली होती. भाजप विरोधात लढवलेले हे दोन्ही उमेदवार उद्या शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने भाजपच्या अडचणी वाढू शकणार आहेत. सध्या पंढरपूर नगरपालिकेत भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या असल्या तरी पंढरपूर नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळं कोणतीही विकास कामे करायची असतील तर सत्ताधाऱ्यांकडून पिळवणूक आणि दडपशाही सुरू असल्याचा आरोप करून भगीरथ भालके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताना उद्याच भाजपच्या नाकावर टिचून अनेक विकास कामांचे जीआर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर मध्ये देतील असा दावाही भालके यांनी केल्याने आता पंढरपूर प्रश्नावर भाजप आणि शिवसेनेची पुन्हा भीडणार असे चित्र आहे.