Pratap Saranaik: मतदार संघातील कामे होत नसल्याने शिवसेनेचे ओवला माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) गुरुवारी चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक यांनी रागाच्या भरात थेट महापालिकेचे मुख्यालय गाठले आणि अपूर्ण कामे झाली नाहीत तर सत्ताधारी पक्षाचा असून आंदोलनाला बसेन असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असेही सरनाईक म्हणाले. सरनाईकांचा राग बघून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी त्यांना दिले. 


'सीबीआयकडून सर्वोच्च सरकारी अधिकाऱ्यांच्या मनोर्धेर्याचं खच्चीकरण' : राज्य सरकार


प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात संघात येणाऱ्या घोडबंदर रोड वर अहोरात्र वाहनांची वर्दळ असते यामध्ये लहान गाड्यांची सोबत अवजड वाहनांचा देखील समावेश आहे. त्यामुळे इतक्या वर्दळीचा रस्ता ओलांडायचा असेल तर स्थानिक नागरिकांना अनेक वेळा विचार करावा लागतो आणि त्यानंतर जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यांची अडचण दूर करण्यासाठी तत्वज्ञान विद्यापीठ आणि आर मॉल येथे बांधण्यात आलेल्या पादचारी पूल याप्रमाणेच सुरज वॉटर पार्क आणि ब्रह्मांड नाका येथे पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव आणला गेला. मात्र, काही कारणास्तव या दोन्ही कडील पादचारी पुलाचे काम रखडले त्यानंतर 2018 साली या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. तसेच निविदा देखील मंजूर करून वर्क ऑर्डर काढण्यात आली. मात्र, आजतागायत या दोन्ही मुलांच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरनाईक यांच्या मतदारसंघात येणाऱ्या उपवन तलावाच्या बाजूला तयार करण्यात येत असलेल्या विसर्जन फाटा च्या तिसऱ्या टप्प्याचे काम अजूनही सुरू झाले नसल्याने ते काम अर्धवट आहे. याच कारणावरून सरनाईक यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


या दोन्ही कामांसाठी निधी मंजुर करण्यात येऊन निविदाही अंतिम झालेली आहे. परंतु, एवढे असतांनाही आता केवळ या कामांचा समावेश 455 कोटींच्या कामांच्या यादीत नसल्याने काम रखडली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पालिकेने देखील हे मान्य केले. परंतु ज्या कामांचा 455 कोटींच्या कामात समावेश नाही, अशा कामांना देखील निधी दिला गेला असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे ही कामे सुरु न केल्यास सत्ताधारी पक्षात असतांनाही आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान पालिकेने यासाठी एक दिवसाची मुदत मागितली असून, आयुक्तांशी चर्चा करुन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहे.