मुंबई : भाजप नेते (BJP) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या भेटीपूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar)  यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  यांची भेट घेतली आहे. रात्री  1  सकाळी 8 तब्बल सात  तास अजितदादा दिल्ली दौऱ्यावर होते.   रात्री उशिरा  अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते .  आज सकाळी भाजपच्या जेष्ठ नेत्याची भेट झाल्याची माहिती  सूत्रांनी  दिली आहे.आजच अजित पवार मुंबईला रवाना झाले आहे. 


लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Maharastra Vidhan Sabha Election)  तयारी सुरू झाली आहे.  अजित पवारांच्या दिल्लीतील भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे. 


अजित पवारांसोबत दिल्ली दौऱ्याला कोण कोण होते?


अजित पवार हे अमित शाहांच्या भेटीसाठी आले होते. विधानसभा निवडणुकांची तयारी या अनुषंगाने ही भेट होती. अजित पवारांसोबत सुनील तटकरे, प्रफुल पटेल होते.  अजित पवारांनी काय चर्चा केली अद्याप या विषयी कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत देखील केंद्रीय नेतृत्वाची भेट झाली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक


अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आजच  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक  आज संध्याकाळी साडेपाच वाजता अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.   बैठकीमध्ये पक्षांतर्गत सर्व्हे,  लाडकी बहिण योजना लोकांपर्यंत पोहोचवणे संदर्भातली रणनीती यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर दोन दिवसांनी अजित पवार दिल्लीला महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीसाठी जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अजित पवार तातडीने मुंबईला


आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट घेऊन अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. 


Video :  अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट



हे ही वाचा :


Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं विधानसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोलेंना गुड न्यूज! तिकडं महाविकास आघाडीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला