Bees Attack : राज्यातउष्णतेच्यापारदिवसागणिकवाढतअसल्याचेचित्रआहे. अशातच मधमाशांच्याहल्ल्याच्या (Bee Attack) घटनांमध्येवाढहोतानादिसतआहे. राज्यातील चंद्रपूर, जळगाव आणि नंदुरबार मध्ये मधमाशांनी हल्ला करतअनेकांनाजखमीकेल्याच्याघटनाघडल्याआहे. यातपहिलीघटनाजळगावजिल्ह्याच्या मुक्ताईनगरमध्येघडलीआहे. चारठाणा येथे अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनीअचानक हल्ला चढला आहे. यावेळी नागरिकांना स्मशान भूमीतून पळ काढावा लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने नव्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, या हल्ल्यात आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

याहल्ल्यात जखमी झालेल्यांना इतरत्र खाजगी व काहींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याने अंत्यसंस्कासाठी आलेल्या ग्रामस्थची मोठी धावपळ उडाली. सध्यायाघटनेचा व्हिडिओ सोशलमीडियावरव्हायरलहोतआहे.

Chandrapur Bees Attack :चंद्रपूरच्या नागभीडमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात पाच पर्यटक जखमी

Continues below advertisement

दुसरीकडेचंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील सात बहिणी डोंगर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात पाच पर्यटक जखमी झालेआहे. या घटनेनंतर स्वॅब संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू मिशन राबवून जखमी पर्यटकांना डोंगराच्या खाली आणलं. शनिवारी दुपारी शंकरपूर येथील पर्यटक लहान मुलाचा नवस फेडण्यासाठी सात बहीण डोंगर येथे आले होते. मात्र दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सर्व सैरावैरा पळू लागले. हा दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षितपणेपोहचणे कठिण होत होते. परिणामी मधमाश्यांच्या हल्ल्यात सर्व जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोचले.

सध्याजखमींना उपचारार्थ गोविंदपूर आणि तळोधी येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. पर्यटकांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Nandurbar Bees Attack नंदुरबारच्या नवापूरमध्ये मधमाशांचाहल्ला, एक महिला गंभीर, 30 ते 40 जण जखमी

दरम्यान, अशीचएकघटना नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात डली आहे. रात्री उशिरा मधमाशांनीअचानक हल्ला केलाय. महामार्गावरील बाजारपेठ असल्याने रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ गजबजलेली असते. अशातच मधमाशांनीरात्रीच्यासुमारासहल्लाकेला. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झालीअसून इतर 30 ते 40 जण जखमी असल्याची माहिती आहे. जखमी वर विसरवाडी ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. बाजारपेठे जवळ अज्ञात व्यक्तीने मधमाशांच्या पोळ्यावर दगड फेकल्याने हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.