एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

बीडमध्ये प्रवीण दरेकरांच्या मुलाचे बॅनर, मंत्री पंकजा मुंडेंचा बॅनरवर फोटो नाही, भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर 

बीड (Beed)  जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) बॅनरवर फोटो टाळत भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या मुलाचे बीडमध्ये बॅनर लागले आहेत.

बीड : बीड (Beed)  जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बॅनरवर फोटो टाळत भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या मुलाचे बीडमध्ये बॅनर लागले आहेत. यश प्रवीण दरेकर केसरी बैलगाडा शर्यतीचे बीडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, चित्रा वाघ यांचे फोटो

दरम्यान, बीडमध्ये कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो नाही. त्यामुळं बीड जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे चिरंजीव डॉक्टर यश प्रवीण दरेकर यांचे बीडमध्ये मोठे बॅनर समर्थकांकडून लावण्यात आले आहेत. परंतू, या बॅनरवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे छायाचित्र टाळण्यात आले आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, चित्रा वाघ यांचे छायाचित्र आहेत. परंतू, पंकजा मुंडे मंत्री असताना आणि बीड जिल्ह्यातील असताना देखील त्यांचे छायाचित्र टाळण्यात आले आहे. डॉक्टर यश दरेकर केसरी बैलगाडा शर्यतीनिमित्त हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून भाजपमधील गटबाजी दिसून येत आहे.अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं जात आहे. विशेष राजकीय नेतेमंडळी अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत असल्याचे दिसत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती, पण बीड जिल्ह्यात निवड रखडली

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Elections 2025) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही. याला मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या वादाची किनार आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.  बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. मात्र भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये मात्र अध्यक्ष पदाची निवड रखडल्याचे पाहायला मिळत आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Beed News : राज्यभरात नियुक्त्या, बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांची घोषणा रखडली; पंकजा मुंडे-सुरेश धसांच्या वादाची किनार? चर्चांना उधाण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal on Bihar Election :बिहारमध्ये काँग्रेसचं काय चुकलं? हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Bihar Result :त्यांचा विजय होणारच होता,बिहार निकालावर वडेट्टीवार असं का म्हणाले?
Harshwardhan Sapkal on Bihar Election : महाविकास आघाडीत कोणतंही भांडणं नाही, सपकाळ स्पष्टच म्हणाले..
BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश,  भाजपकडून जल्लोष साजरा
Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Embed widget