Beed News Updat : बीडमधील एका संस्थेच्या दानपेटी जवळ एक नवजात अर्भक आढळून आले आहे. तीन ते चार दिवसांचं स्त्री जातीचं हे अर्भक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. इन्फंट इंडिया ( आनन्दग्राम ) या संस्थेच्याबाहेर हे अर्भक सापडले आहे. हे अर्भक कोणी आणि का सोडून गेले आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. 


इन्फंट इंडिया ही एड्स बाधितांसाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये एचआयव्ही बाधित लहान बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंतच्या लोकांचे संगोपन केलं जातं. दत्ता बारगजे आणि संध्या बरगजे हे दांपत्य मागच्या अनेक वर्षापासून ही संस्था चालवत आहेत.  शासकीय अनुदानाशिवाय केवळ दानशूर लोकांच्या मदतीतून आणि सहकार्यातून ही संस्था अनेकांच्या जगण्यासाठी जणू काही जीवन वाहिनी बनली आहे. धुळे सोलापूर हायवेवर पाली गावच्या बाजूला उंच डोंगरावर वसलेल्या या संस्थेला मदत मिळावी म्हणून बिंदुसरा तलावाच्या बाजूला एका रस्त्यावरत दानपेटी लावण्यात आली आहे. याच दानपेटीच्या शेजारी हे अर्भक सापडले आहे.  
  
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज साडेपाच वाजता दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे हे मतदान करून इन्फंट इंडिया या आपल्या संस्थेत निघाले होते. यावेळी दानपेटीच्या बाजूला पाणी जाण्यासाठी काढलेल्या नालीमध्ये कुणीतरी कपडे आणून ठेवलेत असं दत्ता बारगजे यांना वाटलं. त्यामुळे ते दानपेटी जवळ गेले आणि तेथे नक्की काय आहे ते पाहिलं. यावेळी त्यांना कपड्यांमध्ये लपटलेले एक छोटस गोंडस बाळ आढळून आले. यावेळी दत्ता बारगजे यांनी तात्काळ बीड सिविल हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉक्टर हणमंत पाखरे यांना फोनवरून याबाबतची माहिती कळवली.  


माहिती मिळताच डॉक्टर पाखरे यांनी इन्फंट इंडिया बालग्राममध्ये दाखल होत बाळाची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे समजले. यावेळी सगळ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला. तीन ते चार दिवसांपूर्वी जन्मलेले कोण बाळ किती वेळा पासून त्या ठिकाणी ठेवलेले असेल याची कल्पना कोणालाच नव्हती. पण डॉक्टरांनी सगळे तपासणी केल्यानंतर चार दिवसाचे ते कोवळे बाळ शंभर टक्के फिट असल्याचे सांगताच सगळ्याचाच जीव भांड्यात पडला. या बाळाचं वजन तीन किलो पेक्षा जास्त असून आता याच प्रकल्पात राहणार आहे. 


कुणाचं जन्मताच तर कुणाचं अर्ध आयुष्य संपल्यानंतर एका दुर्धर आजाराची लागण होते आणि तिथून पुढे त्यांच्यासमोर जगाव की मरावं एवढाच एक प्रश्न असतो. अशा कठीण प्रसंगी लोक या इन्फर्ट इंडिया आनंदग्राम संस्थेत येतात. या संस्थेत आलेली माणसं आनंदाने आपलं आयुष्य जगतात. 


महत्वाच्या बातम्या


Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का! आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र