Beed News : एसटीच्या (ST Strike) 73 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांनी (ST employees) 100 दिवसापेक्षा जास्त दिवस आंदोलन केले आहे.. एसटी पूर्वपदावर यायला जरी सुरुवात झाली असली तरी एसटीचे आंदोलन अद्याप मिटलेले नाही. राज्यातील वेगवेगळ्या भागात 25% एसटी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


"डर गुलामी की निशानी है!" असे म्हणत ST कर्मचाऱ्यांचा एल्गार


राज्यभरातील जवळपास 65 लाख लोक रोज एसटीने प्रवास करायचे मात्र हीच एसटी 100 दिवसापेक्षा जास्त काळापासून बंद आहे. एसटीचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी आणखी ही कर्मचारी ठाम आहेत. बीडमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण झाले असून आता यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. राज्यभरातील 90 हजार कर्मचारी ST विभागात काम करतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 90 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यभरातील 18 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्याचे निलंबन झाले आहे. राज्यभरातील एसटीचे पाच हजार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 


प्रवासी वर्गाला मोठा त्रास


मागील तीन महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून कर्मचारी संपावर ठाम आहे. अनेक आगारात अजूनही काही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट सांगितले आहे की विलिनीकरण शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करु असे सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे सध्या एसटी विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे.


मागण्यांसाठी कर्मचारी कायम


सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार  हमी सरकारने द्यावे, सर्व कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घ्यावे यासोबत शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रद्द करण्यात यावी  आणि इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहे. तर काही ठिकाणी सरकारसोबत बातचीत करुन मार्ग काढण्यासाठी कर्मचारी तयार आहेत. असे समजते


संबंधित बातम्या :


Nanded: अवघ्या दोन दिवसांचे प्रशिक्षण अन् यांत्रिकी कर्मचारी बनले चालक तर वाहतूक नियंत्रक बनले वाहक, नांदेडमधील प्रकार