Beed News :  बीडच्या माजलगावात धक्कादायक घटना घडली आहे. घरात झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसून एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खंडोबा मैदान परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. वृंदा समीर रुद्रवार असे मृत मुलीचे नाव असून ती अवघी 9 वर्षांची होती. 

Continues below advertisement

नेमकी कशी घडली घटना?

मंगळवारी भगवान महावीर जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने वृंदा आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर झोका खेळत होती. यावेळी ती खुर्चीवर चढून झोका पकडण्याचा प्रयत्न करत असताना खुर्ची अचानक कलंडली. त्यामुळे झोक्याची दोरी तिच्या गळ्याभोवती अडकून गळफास बसला. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वृंदा जेवणासाठी खाली का आली नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर गेली असता हा प्रकार उघडकीस आला. मुलीची अवस्था पाहून आईने आक्रोश केला. आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यही धावत आले. त्यांनी तात्काळ वृंदाला रूग्णालयात दाखल केले.मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वृंदा दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement