Beed News :बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये धक्कादायक घटना गडली आहे. अचानक शेतात उभ्या ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रॅक्टरसह एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यासह वाहन मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Continues below advertisement

शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागली

माजलगावातील सिमरी पारगाव येथे शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत ट्रॅक्टरसह एक एकर ऊस जळून खाक झाला. या आगीमुळे शेतकरी व ट्रॅक्टर मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. ट्रॅक्टरचा चालक पाणी प्यायला गेला असता ट्रॅक्टरच्या हेडमधून ठिणगी किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला आहे.

काही क्षणातच आग भडकली

उसाचा फड कोरडा असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. ट्रॅक्टर पूर्णतः जळून खाक झाला तर शेतातील सुमारे एक एकर ऊस आगीत भस्मसात झाला. स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.यानंतर सदरील शेतकऱ्याने तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

Continues below advertisement