बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्टोअर रुमला आज पहाटे आग लागली. या आगीत अनेक महत्वाची कागदपत्रं आणि जुने दस्तऐवज जळाले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो. मात्र भ्रष्टाचारासंबधी एकही कागद जळाला नसल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.

 

भ्रष्टाचाराबाबतची सर्व कागदपत्रं स्टोअर रुममध्ये नव्हे तर दुसऱ्या रुममध्ये ठेवली होती. त्यामुळे ती कागदपत्रं सुरक्षित आहेत, असं बँकेकडून सांगण्यात आलं.



बीड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

 

अवैध कर्जवाटप आणि घोळ

 

जिल्हा बँकेच्या संचालकांनी बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याप्रकरणी 23 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विना तारण कर्ज मंजूर करणं, तसंच कागदपत्राची खातरजमा न करता कर्ज वाटप करणं, या गुन्ह्यात मातब्बर नेत्यांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.