Beed Crime News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे (Ram Khade) यांच्यावर बुधवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल सायंकाळी सात वाजता माझे त्यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले होते रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मला हल्ला झाला हे समजल्याचे तुळसा खाडे यांनी सांगितले. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे हल्ले घडून आणतात असा थेट आरोप राम खाडे यांच्या पत्नीने केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या तुळसा खाडे?
काल दुपारी अडीच वाजता ते घराबाहेर गेले होते. हल्ला झाला हे माहीत झाल्यावर मी खूप घाबरले होते. या आधी देखील त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. हल्ला करणारे 10 ते 15 जण होते अशी माहिती आम्हाला मिळाली होती. काल सायंकाळी सात वाजता माझे त्यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले होते रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मला हल्ला झाला हे समजल्याचे तुळसा खाडे यांनी सांगितले. जेवण करण्यासाठी ते त्या ठिकाणी थांबले होते. याचवेळी गाडीमागे लपलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. ते घोटाळे काढतात म्हणून त्यांच्यावर हल्ले होत आहेत असे तुळसा खाडे म्हणाल्या. दरम्यान, राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. राम खाडे यांनी काही वार हातावर झेलले. परंतु, इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
आमदार सुरेश धस हे हल्ले घडवून आणतात
आमदार सुरेश धस हे हल्ले घडवून आणतात असा थेट आरोप राम खाडे यांच्या पत्नीने केला आहे. सोसायटी जमिनी बाबत त्यांनी त्यांच्यावर हल्ला झाला अशी शंका उपस्थित करण्यात आली. इथून तिथून सरकार त्यांचं आहे म्हणून प्रकरण दाबले जाते. यापूर्वी आमची गाडी पेटवण्यात आली होती. आमच्या कुटुंबाने घराबाहेर पडायचं नाही का? आमची केवळ एकच मागणी आरोपींना अटक करावी, मला न्याय द्यावा अशी मागणी तुळसा खाडे यांनी केली आहे. हे किती दिवस चालणार? दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार असल्याने हे दाबले जात असल्याचे तुळसा खाडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या: