Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाई येथे लग्नाचे आम्ही दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर दोन वर्षापासून अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूळ लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पीडित महिला सध्या अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. आरोपी सलमान अजीज पठाण यांनी तिला लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. 

Continues below advertisement

पीडीतेला मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी घातली अट

नंतर महिलेने विवाहाचा विषय काढला त्यावेळी आरोपीने तिची फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने पीडीतेला मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. इतक्यावरच तो थांबला नाही तर तुला काय करायचे आहे ते कर असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही दिली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास बीड पोलीस करत असून फरार आरोपी सलमान पठाण याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान धर्मांतरासाठी दबाव आणण्याच्या या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

 महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबचं प्रकरण समोर

नाशिकसह संगमनेरमधील भोंदूबाबाची प्रकरणे ताजी असतानाच मुंबईत देखील भोंदूबाबचं एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईत एका भोंदूबाबा फकीराला अटक करण्यात आली आहे. महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. भोंदू फकीर इरफान नियाज अहमद (वय 34) असं अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे. 

Continues below advertisement

कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

आरोपी मूळचा बहराइच (उत्तर प्रदेश), अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव करत होता. स्वतःला फकीर बाबा म्हणवत महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांच्या समस्या जाणून उपचार आणि दोष निवारणच्या नावाखाली जाळ्यात अडकवत होता. कांदिवलीतील एका महिलेची फसवणूक झाली आहे. पतीच्या मृत्यूचा मुद्दा सांगून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर महिलेसह दोन मुलींवर कथित धार्मिक विधी केला, तसेच तिघींनाही बेशुद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  बेशुद्ध अवस्थेत एका मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 78, 123 तसेच 3(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.