एक्स्प्लोर

Beed Accident  : बीडमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात, शेतमजुराचा जागीच मृत्यू

Beed Accident News : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माजलगाव येथील हिवरा बुद्रुक गावात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघात शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.

Beed Accident News :  बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माजलगाव येथील हिवरा बुद्रुक गावात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघात शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतीच्या वळण रस्त्यावर वळवताना चालक असणाऱ्या शेतमजुराच्या अंगावर ट्रॅक्टर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही  घटना घडली आहे. मृ तरुण हा हिवरा बुद्रुक येथील शेतमजूर असून,  गणेश भारत गाडे वय 28 असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गुरवारी पहाटे 2 वाजता शेतातील कामासाठी ट्रॅक्टर चालवत जात होता. यावेळी शेत वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला टर्न मारत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने गणेश गाडे यात गंभीर जखमी झाला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी रस्त्यावरती बोरवेल ट्रॅक्टर व ॲपे रिक्षामध्ये भीषण अपघात, पाच जण जखमी

 
धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी रस्त्यावरती बोरवेल ट्रॅक्टर व ॲपे रिक्षामध्ये आज दुपारी अपघात झाला आहे. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. शिरपूर वाघाडी  रस्त्यावरील वाघाडी टी पॉइंट जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बोरवेल ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या ऑपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होते की बोरवेल ट्रॅक्टर वर ठेवलेला बोरवेल चा पाईप थेट रिक्षामध्ये आरपार घुसला आणि हा भीषण अपघात झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
 

नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर, दोन जण जखमी

नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत चालले आहे. या मार्गावर 60 किमी प्रतितास अशी अधिकृत वेगमर्यादा असतानाही अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून अति वेगाने वाहन चालवत असल्याने निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. नेरूळ ते सानपाडा मोराज सिग्नल दरम्यान एक भीषण अपघात घडला. एका ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील हुंडाई अलंट्रा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्यालगत असलेल्या बोलार्डला जोरात धडकली व दोन पलटी खात थांबली. या अपघातात कार चालक आणि ऑटो चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget