मुंबई : टिपू सुलतानच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन भाजपाने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हिरव्या रंगाच्या या पोस्टरमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातले भगवे उपकरणे हिरवे दिसत असल्याने भाजपाने सेनेच्या हिंदुत्वावरच टीका केली आहे. तर बॅनर बनवणारे सलमान हाशमी यांनी या बॅनवर भाजपाने छेडाछेड केल्याचा आरोप करुन, बॅनर भगव्या रंगाचं होतं. माञ जातीय तडे लावण्यासाठी भाजपाने गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप करुन, याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याच सांगितलं आहे.


शिवसेना आणि भाजपा एक काळचे कट्टर समर्थक, माञ आता एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक ही संधी सोडत नाही. त्यात आता एका बॅनरवरुन भाजपाने सेनेच्या हिंदुत्वावरच निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मिरा भाईंदर युवा संघटक सलमान हाशमी यांनी टिपू सुलतानाच्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर प्रकाशित केले असून, त्यावर आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे, मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांचीही छायाचित्रे आहेत.


या बॅनरमध्ये टिपू सुलतान यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश देण्यात आला आहे. माञ बॅनर हिरव्या रंगाचा बनवला असून, स्व. बाळासाहेब ठाकरेंचा उपरणे ही भगव्यावरुन हिरवा केलं आहे. तर मग काय भाजपा हा मुद्दा कसा सोडेल. त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. शिवसेनेने केव्हाच भगवा सोडून हिरवा हाती घेतला आहे. हिंदुत्व विसरून ही गेले आहे. आता त्यांनी राष्ट्रपुरुषही बदलले आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर होणे शक्यच नाही, पण धर्मांध टिपू सुलतानचा वाढदिवसही धूमधडाक्यात साजरा करण्याचे काम शिवसेना मतांसाठी लाचारीने करते आहे, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.


यावर शिवसेनेचे मीरा भाईंदर युवा शहर संघटक सलमान हाशमी यांनी भाजपा घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करुन, देशात जातीय तडे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक थोर व्यक्तींच्या जंयती दिवशी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर मी बनवत असतो आणि ते सोशल मीडियावर प्रसारीत ही करत असतो. टिपू सुलतान यांचा बॅनर नोव्हेंबर महिन्याचा असून, तो भगव्या कलरमध्ये आहे. माञ सेनेला बदनाम करण्यासाठी भाजप मुद्दामून हिरवा करुन, राजकारण करत आहे. याविरोधात आपण दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.