Balasaheb Thorat on Election Commission: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (19 ऑक्टोबर) बोगस मतदारांवरुन निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा घेरलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बोगस मतदार हा कळीचा मुद्दा झाला आहे. राज्यात तब्बल 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप आज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना केला. या मेळाव्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना एकप्रकारे दुजोरा देत राज्यातील मतदारयादीमध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती असल्याचे म्हटलं आहे. 

Continues below advertisement

मतदारयादीमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे

बाळासाहेब थोरात म्हणाले की काही ठिकाणी नाव घुसवण्यात आली आहेत. ती दुरुस्त झालीच पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. थोरात म्हणाले की, मतदारयादीमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या मताचे आम्ही देखील आहोत. निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत. मतदार यादीचा घोळ हा मोठा फंडा असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. बाहेरचे लोक आणून मतदार यादीमध्ये घुसवले जात आहेत. जिल्हा परिषदेतील नगरपालिकेत आणि नगरपालिकेतील जिल्हा परिषदेत असे वेगवेगळे मतदार डिजिटल काळामध्ये सर्व घडवून आणलं जात असल्याचे ते म्हणाले. हे सर्व हेतू पुरस्कृत केलं जात आहे, हा लोकशाहीसाठी दुर्दैवाचा भाग असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. राज ठाकरे यांनी काय म्हटलंय मला माहित नाही पण मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या