Bala Nandgaonkar Meets Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत असतानाच आज (14 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक बाळा नांदगावकर आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. मनसे आणि राष्ट्रवादीची जुंपली असतानाच थेट मंत्रालयामध्ये भेटीसाठी पोहोचल्याने बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रालयामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, ही भेट कोणत्या कारणास्तव होत आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. 


पण अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत


दरम्यान, राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गाडीवर सुपाऱ्या फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करताना अजित पवारांवर मात्र स्तुतीसुमने उधळली होती. राज यांनी बोलताना अजित पवार (Raj Thackeray on Ajit Pawar) यांच्यासोबत कितीही मतभेद असले तरी ते कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत असं सांगितले. राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून बोलताना जोरदार पण टीका केली. ते म्हणाले की सगळ्या पक्षांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला असताना अजून त्याचा निर्णय का होत नाही? मोदी मागील दहा वर्षे बहुमताने सत्तेत होते, तर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित का केला नाही? मोदी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो म्हणतात, मग पवारांनी मराठा आरक्षणासाठी शब्द का नाही टाकला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या