मुंबई : सध्या पावसाळी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून महाराष्ट्रातील बहुतांश खासदार दिल्ली दरबारी आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेही दिल्ली दरबारी असून आपल्या खासदारांसमवेत ते विविध विषयांवर संवादही साधत असतात. त्यातच, शरद पवारांसमवेत विमानप्रवास करण्याची संधी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी अत्यानंतर व्यक्त केला आहे. माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण असल्याचं त्यांनी फोटो ट्विट करुन म्हटलंय. बजरंग सोनवणे हे संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला गेले होते. विशेष म्हणजे दिल्लीला जाताना ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत विमानप्रवास करुन गेले. आता, परत येताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत ते परत येत आहेत. ससंदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आता शनिवार व रविवार 2 दिवस सुट्टी असल्याने खासदार (Parliment) मंडळी मायभूमीत म्हणजे महाराष्ट्रात येत आहेत.


राज्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे नेते दिल्लीत मराठी म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रतिनीधी म्हणून एकत्र वावरताना दिसून येतात. दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि खासदार अमोल कोल्हे यांची अशीच भेट महाराष्ट्राने पाहिली होती. तर, शरद पवार यांच्यासमवेत विमान प्रवास करण्याचा आनंद बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शब्दात मांडला आहे. 


अविस्मरणीय क्षण! देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शेजारी बसून विमानप्रवास आणि साहेबांशी माझा हृद्य संवाद झाल्याचं सोनवणे यांनी म्हटलं. शरदचंद्र पवार साहेब हे केवळ नाव नाही तर एक संपूर्ण विचार आहे, याची प्रत्येक क्षणाला प्रचिती आली. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर केलेला हा विमान प्रवास माझ्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणांपैकी एक आहे. प्रत्येक क्षेत्रातील विषयाबाबतीत आदरणीय पवार साहेबांनी माझ्याशी सखोल चर्चा केली. बीड जिल्ह्याविषयी त्यांची खडान् खडा माहिती तसेच जिल्ह्याच्या कृषी, सिंचन, विकासविषयक सखोल माहितीने आश्चर्यचकित झालो. अनेक जुन्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.






साहेब, आपण दिलेल्या प्रेमाने भरून पावलो. आपल्या मार्गदर्शन आणि स्नेहाचा हात माझ्या पाठीवर अक्षुण्ण राहो, ही पांडुरंगचरणी प्रार्थना करतो,असेही सोनवणे यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करुन यंदा दिल्ली गाठली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंसारख्या बलाढ्य नेत्याला पराभूत केल्यामुळे सोनवणे यांचं राजकीय वजन वाढलं असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांचा वेगळाच थाट दिसून येतो. 


हेही वाचा


मोठी बातमी: जात-धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणीसोबत लगीनगाठ बांधली, जातअभिमान बाळगणाऱ्याने बापाने जावयालाच संपवलं