Badlapur Local Train News : मध्य रेल्वेवरील सर्वात गजबजलेल्या स्थानकांपैकी एक असलेल्या बदलापूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पत्र्याचे शेड नसल्याने प्रवाशांना अक्षरशः पावसात भिजत लोकलची वाट पाहावी लागत होती. हीच समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर शेड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम सुरू असताना कोणताही अपघात टाळण्यासाठी रेल्वेने लोकलच्या थांब्यात मोठा बदल केला आहे. कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलचा थांबा आता 3 डबे मागे सरकवण्यात आला आहे.अचानक या बदलामुळे प्रवाशांची धावपळ चांगलीच वाढली आहे. एकीकडे हे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले असते तरी याच प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या अशाच प्रकारे पत्र्याचे शेड टाकण्याचं काम रेल्वे प्रशासनानी हाती घेतले होते. मात्र या ठिकाणी अनेक दिवसांपासून केवळ लोखंडी पोल उभे केले असून त्यावर अजूनही पत्रे बसवण्यात आलेले नाहीत.

अशातच, सध्या मे महिन्याचा उन्हाचा चटका वाढत असताना प्रवाशांना या ठिकाणी सावलीविना उभे राहावे लागत आहे. "पावसाळा तोंडावर आला असताना हे अर्धवट काम पूर्ण कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करत सध्या प्रवाशांच्या स्थानकावरती संताप व्यक्त होत आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता रेल्वे प्रशासनासमोर आहे.

Badlapur Local Train News : खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा थांबा नेहमीच्या जागेपेक्षा 3 डबे मागे

मध्य रेल्वेवरील अत्यंत वर्दळीच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पत्र्याचे शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात आणि पावसात उभे राहून लोकल पकडावी लागत होती. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने अखेर शेड उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, या कामादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा थांबा नेहमीच्या जागेपेक्षा 3 डबे मागे, म्हणजेच कल्याणच्या दिशेला हलवण्यात आला आहे.

Badlapur Local Train : ऐन गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर धावपळ आणि गोंधळाचे चित्र

इंडिकेटर्स आणि डब्यांचे फलकही त्यानुसार बदलण्यात आले आहेत. तरीही या बदलाची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत न पोहोचल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर धावपळ आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे.एकीकडे नवीन शेडचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसत असले, तरी दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच प्लॅटफॉर्मवर पूर्वी सुरू केलेले शेडचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असून, अनेक दिवसांपासून फक्त लोखंडी खांब उभे आहेत. त्यावर पत्रे बसवण्याचे काम पूर्ण झालेले नाही.

Badlapur News : मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यात प्रवाशी सावलीविना

मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यात प्रवाशांना सावलीविना उभे राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “पावसाळा तोंडावर आला असताना हे काम पूर्ण कधी होणार?” असा सवाल आता बदलापूरकर करत आहेत.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना उद्घोषणांकडे लक्ष देण्याचे आणि या तात्पुरत्या बदलात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून, बदलापूरकरांना हक्काची ‘सावली’ वेळेत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या एकीकडे रेल्वे प्रशासनाचा हे स्थानकावरती काम सुरू आहे तर दुसरीकडे प्रवाशांचा देखील संताप आहे.

इतर महत्वाच्या बातम्या