Bachchu Kadu on Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असतानाही विदर्भात दररोज दहा ते पंधरा आत्महत्या होत आहेत. यामुळे आम्हाला खाल मानेनं पाहावं लागतं, छत्रपती असते तर दूरगामी पायतुक केला असता. लगतच्या छत्तीसगडमध्ये 3100 भाव मिळते तर आम्हाला इथे 2800 च्या वर जात नाही. आम्ही थांबणारे लोक नाही शिवसैनिक शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. याबाबत आवाज उचलायचा नाही का? सत्तेत आहे म्हणून आम्ही शांत बसायचं का? असा प्रश्न शिवसेना नेते आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित करताना राज्य सरकारच्या धोरणांवर जबर टीका केली. भंडाऱ्यात शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

Continues below advertisement

शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा सरकारला इशारा

दरम्यान, बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीला घेऊन नागपुरात जनआंदोलन केलं. त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आता कर्जमाफी देताना शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे, यावर बच्चू कडू यांनी निशाणा साधला. बच्चू कडू म्हणाले की,  शेतकऱ्यांची कर्जमाफीत पूर्ण फसगत होत नाही. असं नाही की, कोणाला लाभचं होत नाही. काही दुरुस्त्या करणे आवश्यक आहे आणि त्या दुरुस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहोत. अधिवेशनात आवाज उठवू आणि नाही झालं तर आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. 

येणारा काळ शिंदे साहेबांचा असेल

दुसरीकडे, नवी मुंबई इथं पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावर प्रसंगीच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच नावं नव्हतं. यावर बच्चू कडू यांनी प्रहार करताना, येणारा काळ शिंदे साहेबांचा आहे. पत्रिकेत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे. त्यांनी त्यांनी ते ते समजावं...पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबांचे येणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. आता पत्रिकेत नावं नसू द्या, येणारा काळ मुख्यमंत्र्याचं नावं म्हणून शिंदे साहेब असतील...असा दावा बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या