एक्स्प्लोर

Akola News : स्ट्रेचर अभावी पाठीवर पती, व्यवस्थेची अधोगती! अकोला जिल्हा रुग्णालयातील 'त्या' व्हिडिओनंतर बच्चू कडूंनी अधिष्ठात्यांना घेतलं फैलावर, रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

Akola News : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) अकोला जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील असुविधावरून त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना चांगलंच झापलय.

Akola News : अकोला जिल्हा रुग्णालयातील (Akola District hospital) एका व्हायरल व्हिडिओनंतर अकोल्यात वातावरण चांगलं संतप्त झालेय. स्ट्रेचर नसल्यामुळे एका महिलेने चक्क आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात उपचारासाठी मदत मागितल्याचा हा व्हिडिओ होता. रुग्णालय प्रशासनाने हा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणीच्या हेतूवर शंका घेतलीय. मात्र या घटनेनंतर संतप्त झालेले शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) अकोला जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील असुविधावरून त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना चांगलंच झापलय. रुग्णालयातील अनागोंदीचा जाब विचारताना बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोपही लावलेत.

Bacchu Kadu on Akola District hospital : कंपनीचे काम जरी बंद असले तरी अधिष्ठातांना कमिशन सुरू

रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे कंत्राट मिळालेल्या भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कंपनीचे काम जरी बंद असले तरी अधिष्ठातांना कमिशन सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अधिष्ठाता सोनूने नागपूरचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही बच्चू कडू म्हणालेत.

Akola District hospital: आरोग्य यंत्रणेच्या संवेदनेची लक्तरं वेशीवर, व्हिडीओमध्ये नेमकं काय?

अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या संवेदनेची लक्तरं वेशीवर टांगल्या गेलीय का? असा संतप्त सवाल विचारला जातोय. त्याला कारण ठरलं ते जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील संवेदनशील आणि भोंगळ कारभाराचा व्हिडिओ. यात चक्क स्ट्रेचर नसल्याने रुग्ण पतीला पाठीवर घेऊन धावपळ करणाऱ्या महिलेला मदत मिळाली नाही. तर दुसरीकडे रुग्णालयाचा 'वार्डबॉय' तंबाखू चोळण्यात मग्न असल्याचे यात दिसून आलं.

पाठीवर घेतलेला आजारी पती, समोर छातीशी लटकवलेली बॅग अन् मागे मागे चालत असलेली या महिलेची छोटीशी निरागस मुलगी. अन् 'ती' जीवाच्या आकांताने आपल्या पतीला उपचार मिळावा यासाठी रुग्णालयातील प्रत्येकाला कुठे मदत मिळेल हे विचारतेय. यावेळी रुग्णालयातला कोणी कर्मचारी तंबाखू चोळत असतो. तर कुणाचं तिच्याकडे लक्ष नसतंय. तिची मात्र एकच तगमग की ब्रेन स्ट्रोकमुळे अपंगत्व आलेल्या आपल्या धन्याला उपचार मिळावा. हे भयावह चित्र आहे 'विश्वगुरू' होण्याचे ढोल बडवणाऱ्या आपल्या भारत देशातलं आणि गतिशील सरकारचा दावा करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातलं. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार आणि असंवेदनशीलतेची लक्तरं अक्षरशः वेशीवर टांगल्या गेलीयेत.

Akola News : व्हिडिओ शूट कर वस्तुस्थिती मांडणाऱ्या तरुणीवर रुग्णालय प्रशासनाला संशय

दरम्यान, अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील या संवेदनशील आणि भोंगळ कारभाराचा व्हिडिओ चित्रित केलाय अनुराधा नाठे नावाच्या या तरुणीने. रुग्णालयाचा कारभार रोज कसा चालतो यावर भाष्य करणारा हा बोलका व्हिडिओ आहे. मात्र, हा व्हिडिओ शूट करताना रुग्णालय प्रशासनाने आपल्याला अटकाव केल्याचा आरोप या तरुणीने केलाय. यासंदर्भात 'एबीपी माझा'ने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाचा संबंध राजकारणाशी जोडून या प्रकरणाला बगल दिली आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची २०० तोळे सोन्याची फसवणूक, सराफाविरोधात गुन्हा दाखल..
Maharashtra Breaking LIVE Updates: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची 200 तोळे सोन्याची फसवणूक, सराफाविरोधात गुन्हा दाखल
Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget