Bacchu Kadu : 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आज शेतकीर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका काय आहे? शेतकरीनेते समाधानी आहेत का? या निर्णयानंतर बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का? याबाबतची माहिती पाहुयात. सातबारा कोरा करावाच लागेल, सातबारा कोरा होणारच असे कडू म्हणाले.
आम्ही तारखेसाठीच आलो होतो आम्ही समाधानी : बच्चू कडू
आज बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, रविकांत तुपकर यांच्यासह काही शेतकऱी नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक झाली. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाली. यामध्ये 30 जूनच्या आत कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला सरकारनं योग्य वेळ आणि तारीख दिली आहे. आम्ही तारखेसाठीच आलो होतो. आम्ही समाधानी असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाळणार असल्याचं सांगितलं
30 जून च्या आता कर्जमुक्ती करु असा शब्द सरकारने आम्हाला दिला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. आम्ही तारखेसाठीच आलो होतो ती तारीख आम्हाला मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे की, आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत असे कडू म्हणाले. सरकारनं योग्य वेळ दिली आहे. आता तरी आम्ही समाधानी आोहत. मेंढपाळाच्या बाबतीत त्यांनी जागा देण्याचे कबूल केलं आहे. सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल असे कडू म्हणाले.
बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का?
या निर्णयानंतर बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना कडूब म्हणाले. बाकीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करुन आम्ही याबबतचा निर्णय घेऊ असे कडू म्हणाले. या आंदोलनाचा मी जरी चेहरा असलो तरी या आंदोलनात राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, रविकांत तुपकर, वामनराव चटप यांचे योगदान असल्याचे कडू महणाले. मी यातील एक लहान कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. शेतकरी नेते मोठ्या मनानं या आंदोलनात सहभागी झाले आहेत असे कडू म्हणाले. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की, तूर्तास तरी आंदोलनाचा गरज नाही. आम्हाला जर गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढं खुळं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. अनेक लहान मोठ्या संघटनांनी, मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला होता, त्यांचे सर्वाचे आभार, सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे आभार असे कडू म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: