तिथं 2 शिपाई असते तर 28 लोकांचा मृत्यू झाला नसता, दहशतवादी हल्ल्यावरुन बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार
जिथं दहशतवादी हल्ला झाला तिथे एकही शिपाई नव्हता. यावर कोणीच बोलत नाही. दोन शिपाई असते तर 28 लोकांचा मृत्यू झाला नसता.

Bacchu Kadu : जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र नागपुरात आणायचा आहे. सरकारला सळो की पळो करायचं आहे. दोन दिवस नागपूर बंद पाडायचे आहे, असं वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलं. दिव्यांगांना महिना 6 हजार रुपये आणि शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय नागपुरातून परत जायचे नाही असेही कडू म्हणाले. शेतकरी रोज मरत आहे, पण आपल्याला राग येत नाही. जाती धर्माच्या नावावर पेटावं अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जिथं दहशतवादी हल्ला झाला तिथे एकही शिपाई नव्हता. यावर कोणीच बोलत नाही. दोन शिपाई असते तर 28 लोकांचा मृत्यू झाला नसता.
निवडणुकीत पडलो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुन्हा कामाला लागलो, नव्या ऊर्जेने कामाला लागल्याचे कडू म्हणाले. चांगल काम करणाऱ्यांना संताजी धनाजी पुरस्कार दिले. विषय पुरस्कार देण्याचा नाही. संताजी धनाजी हा पुरस्कार दिला, कार्यकर्त्यांनी कसे लढावे ही प्रेरणा देण्यासाठी दिला असल्याचे कडू म्हणाले. आर्थिक विषमतेने शेतकरी मरतो. धर्म जातीच्या नावावर पेटवले जाते. कबर, वाघ्या कुत्रा यासारखे विषय आहेत असे कडू म्हणाले.
दोन शिपाई असते तर 28 लोक मेले नसते
जिथं दहशतवादी हल्ला झाला तिथे एकही शिपाई नव्हता. यावर कोणीच बोलत नाही. दोन शिपाई असते तर 28 लोकांचा मृत्यू झाला नसता. पण ही चूक केली त्याचा निषेध कोणी केला नाही. खऱ्या मुद्यापासून दूर ठेवले जात असल्याचे कडू म्हणाले. लाडकी बहिण योजन, कर्जमाफीचं आश्वासन सरकारने निवडणुकीच्या वेळेस दिले पण पूर्ण काही केले नसल्याचे कडू म्हणाले.
देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. यावेळी 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर सरकारने देखील पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलायचा सुरुवात केली आहे. सिंधू जल करार स्थगिती केल्याचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे. तेथील कापूस आणि भात शेती संकटात येणार आहे. तसेच अटारी आणि वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळं भारतातातून पाकिस्तानात होणारा व्यापार देखील बंद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
सत्ताधाऱ्यांचं पिठाकडे लक्ष, शक्तीकडे नाही, शक्तीपीठ महामार्गावरुन बच्चू कडूंचा हल्लाबोल, कर्जमाफीवरुनही सरकारला सवाल























